Masjid row : आता कर्नाटकमधील मशिदीत हिंदू मंदिर अवशेष सापडल्याचा दावा; परिसरात कलम 144 लागू

Masjid row : आता कर्नाटकमधील मशिदीत हिंदू मंदिर अवशेष सापडल्याचा दावा; परिसरात कलम 144 लागू

Masjid row : आता कर्नाटकमधील मशिदीत हिंदू मंदिर अवशेष सापडल्याचा दावा; परिसरात कलम 144 लागू

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दाव्यानंतर आता कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरुमधूनही असेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील मलाली भागातील एका जुन्या मशिदीखाली हिंदू मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. यानंतर आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागत मशिदींच्या कागदपत्रांची पडताळणी हो नाही तोपर्यंत मशिदीच्या (karnataka juma masjid) जीर्णोद्धाराचे काम थांबवावे अशी मागणी केली आहे. यामुळे कर्नाटकातही मशीद आणि मंदिराचा मुद्दा आता गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर जुमा मशिदीच्या आजूबाजूच्या 500 मीटर परिसरात 24 मेच्या संध्याकाळीपासून ते 26 मेच्या सकाळी 8 वाजेपर्यंत कलम 144 लागू (juma masjid 144 impose) करण्यात आले आहे. यासोबत मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

मशीद आणि मंदिराचा मुद्दा आता गंभीर होत असून आज (२५ मे) हिंदू संघटना मशिदीजवळील मंदिरात विशेष पूजा आयोजित करणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. या वादग्रस्त मशिदीची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी तंबूल प्रश्न पूजेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या पूजेसाठी खास पुजारी गोपाळ कृष्ण पणीकर यांना पाचारण करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणते मंदिर होते आणि कोणत्या देवतेचे मंदिर होते हे स्पष्ट झाल्यास आम्ही कायदेशीर लढाई पुढे करू, असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे.

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशीद प्रकरणावर जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी

मलाली परिसरात कलम 144 लागू

मशिदीजवळील मंदिरात हिंदू संघटनेने आयोजित केलेल्या विशेष पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या भागात कलम 144 लागू करण्यात आले असून मंदिर आणि वादग्रस्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

21 एप्रिल रोजी जुमा मशिदीच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान मंगळुरूच्या गुरुपारा तालुक्यातील मलाली (malali mangalore) मार्केटमध्ये असलेल्या मशीद संकुलातून हिंदू मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा केला जात आहे, यावेळी मशीद प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम केले जात होते. मशिदीचा काही भाग आधीच पाडण्यात आला होता. दरम्यान काही हिंदुत्ववादी संघटनांच्या मते, मशीद बांधण्यापूर्वी येथे मंदिर अस्तित्वात होते. यासोबतच हिंदू कलाकृतींसारखे दिसणारे काही पुरावे सापडल्याची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी (विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल) जावून पाहणी केली.

ज्ञानवापी प्रकरण : शिवलिंगवर कमेंट करणे पडले महागात; एमआयएम पक्षाच्या प्रवक्त्याला अटक

सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून तणाव वाढू नये म्हणून प्रशासन जातीने लक्ष ठेवून आहे. मशिदीशी संबंधित कागदपत्रे घेण्यात आली आणि मशिदीच्या जमिनीशी संबंधित सरकारी कागदपत्रेही जमा करण्यात आली. या जमिनीवर मशीद होती की पूर्वी येथे मंदिर होते हे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत मशिदीच्या पुनर्बांधणीवर बंदी घालण्यात आली असून कोणालाही त्या जागेवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.


First Published on: May 25, 2022 10:52 AM
Exit mobile version