भारतीय गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे निधन

भारतीय गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे निधन

आईनस्टाईनच्या सिद्धांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायण यांचे गुरूवारी निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. मागील ४० वर्षांपासून ते स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त झाले होते. या आजाराने त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासूनच खालावल्याने त्यांच्यावर पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या उपचारादरम्यान आज गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावात २ एप्रिल १९४२ रोजी वशिष्ठ नारायण यांचा जन्म झाला होता. त्यांना गणितातले दिग्गज असल्याने सर्वच त्यांना गणित या विषयातील देव मानायचे तसेच गणिताचे शिक्षक प्राध्यापक, शिक्षक त्यांना गणिताचा जादुगार म्हणून संबोधायचे. आईनस्टाईनच्या सिद्धांताला आव्हान देणारे तसेच गणित सोपे करण्यासाठी अनेक सिद्धांत देखील मांडले आहेत. वशिष्ठ नारायण यांनी शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या सापेक्षताच्या सिद्धांताला आव्हान दिले होते. त्यांच्या जाण्याने अनेकांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मरणानंतरही भोगाव्या लागल्या यातना 

‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेसाठी काम करणाऱ्या या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला मरणानंतरही यातना भोगाव्या लागल्या. वशिष्ठ नारायण सिंह यांचे पार्थिव रुग्णवाहीका नसल्याने तब्ब्ल दीड तास तात्कळत ठेवावे लागले. रुग्णवाहिका चालकाने पार्थिव भोजपूरला नेण्यासाठी पाच हजारांची मागणी केली होती, त्याची व्यवस्था न झाल्याने विलंब झाल्याची माहिती त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार रवी आणि नेते मंडळींनी नारायण यांच्या पार्थीवाला भोजपूरला नेण्याची व्यवस्था केली.

 नासामध्ये देखील होते कार्यरत

शालेय जीवनात अत्यंत हुशार असा विद्यार्थी म्हणून वशिष्ठ यांची ओळख होती. शिक्षकांकडून एखादी पद्धत चुकीची शिकवल्यास ते अडवत. त्यामुळे प्राचार्यांनी त्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले होते. मात्र, या परिक्षेतही ते पास झाले. विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कॅलिफोर्नियातील प्राध्यापक जे कॅली यांनी त्यांची कुशाग्रता ओळखली होती. त्यांनी वशिष्ठ यांना अमेरिकेत नेण्याचे ठरले. यानंतर वशिष्ठ यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. वॉशिंग्टन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले. अमेरिकेत नासा या अंतराळ संशोधन संस्थेत त्यांनी काम पाहिले. भारतात आल्यावर आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई आणि कोलकाता येथे त्यांनी नोकरीही केली.

First Published on: November 14, 2019 2:38 PM
Exit mobile version