चक्क झुरळापासून बनते ‘हे’ औषधी तेल!

चक्क झुरळापासून बनते ‘हे’ औषधी तेल!

जिथे झुरळ या प्राण्याच्या नावानेच लोकांना किळस येते, तिथे झुरळांपासून औषध बनवण्याची कल्पनाच लोकांना सहन न होण्यासारखी आहे. सहसा आपल्याकडे कुक्कुट पालन केंद्र किंवा रेशीम किड्यांची पैदास करणारी केंद्र पाहायला मिळतात. मात्र, चीनी लोकांनी चीनमध्ये थेट झुरळांचं पालन केंद्रही सुरु केलं आहे. इतकंच नाही तर या झुरळांपासून
इथले संशोधक चक्क औषधी तेलंही बनवतात. सर्वसामान्यांच्या स्वप्नातही येणार असा विचार इथल्या लोकांनी मात्र प्रत्यक्षात उतरवला आहे. पालन केंद्रामध्ये पाळण्यात येणाऱ्या तसंच नव्याने पैदा होणाऱ्या झुरळांपासून एक प्रकारचे औषधी तेल किंवा सरबत बनवले जाते. हे तेल बनवणारी कंपनी चीनमध्ये खूपच प्रचलित आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या औषधी तेलाच्या निर्मितीसाठी कंपनीकडून दरवर्षी सुमारे ६०० कोटी झुरळांची पैदास केली जाते.


वाचा: झुरळ पळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

झुरळांना पाळून, त्यांची व्यवस्थित देखभाल आणि वाढ करुन त्यांच्यापासून औषधी तेल बनवणारी ही कंपनी चीनच्या शीचांगमधील आहे. झुरळाचे औषध ही संकल्पना ऐकताच कुणालाही उलटी येईल. मात्र, नवल म्हणजे हे औषध उलट्या आणि जुलाबांवरच गुणकारी आहे. याशिवाय पोटाचा अल्सर, श्‍वासोच्छ्वासातील अडचणी आदी अनेक आजारांवर हे तेल गुणाकारी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे चिनी लोकांमध्ये हे औषध प्रसिद्ध असून, स्थानिक याला इकडचा स्वस्त आणि मस्त उपाय मानतात. त्यामुळे या औषधाचा मूळ गाभा किंवा कच्चा माल असलेल्या झुरळांचं पालन केंद्रामध्ये अतिशय काळजीपूर्वक पालन-पोषण केले जाते. झुरळांप्रमाणेच सापांची पैदास करण्याचीही चीनमध्ये जुनी परंपरा आहे.

First Published on: March 7, 2019 11:54 AM
Exit mobile version