मेक्सिकोतील नाईटक्लबच्या गोळीबारात १५ जण ठार; ४ जण जखमी

मेक्सिकोतील नाईटक्लबच्या गोळीबारात १५ जण ठार; ४ जण जखमी

दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार

मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये शनिवारी रात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार

पब्लिक प्रोसिक्यूटर्स कार्यालयाचे प्रवक्ते जुआन जोस मार्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यात असलेल्या नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे नाईटक्लबमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या गोळीबारामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

टोरांटो शहरात गोळीबार

कॅनडामधील टोरांटो शहरातील ग्रीक टाऊनमध्ये याआधी २२ जुलै रोजी एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू होता. तर १३ जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टोरांटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा हल्लेलखोर देखील ठार झाला होता.


वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरिक्षकावर गोळीबार

वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार


 

First Published on: March 10, 2019 11:51 AM
Exit mobile version