घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरिक्षकावर गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरिक्षकावर गोळीबार

Subscribe

मावळ येथील एका डान्सबारमध्ये दोन गटामध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक गेले असता त्यांना गोळी लागली.

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरिक्षकाला गोळी लागल्याची घटना घडली आहे. मावळ येथील एका डान्सबारमध्ये दोन गटामध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक गेले असता त्यांना गोळी लागली. यामधये ते गंभीर जखमी झाले आहेत.

वाद मिटवताना केला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ येथील फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल भरण्यावरुन दोन गटामध्ये वाद झाला. या वादा दरम्यान एकाला एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. हा वाद मिटवण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहिते गेले. दोन गटातील वाद मिटवत असताना एकाने त्यांच्या पायावर गोळी झाडली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

जखमी पोलिसावर उपचार सुरु 

दरम्यान, डान्सबारमध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीमध्ये ५ ते ६ जण असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे असणारी बंदुक पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचसोबत इतर आरोपींचा शोध सुरु आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. पोलीस उपनिरिक्षक मोहिते यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -