घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार

Subscribe

बंदूकीचा धाक दाखवून पाच लुटारूंनी एक ज्वेलरीचे दुकान लुटले आहे. दुकानात झालेल्या गोळीबारामध्ये एकजण जखमी झाला आहे. चोरांनी सीसीटीव्ही पळवून नेल्याने पोलिसांना तपास कामात अडथळे निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी येथे भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन व्यवसायिकाला लुटण्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. लुटारूनच्या झटापटीत ज्वेलर्स मालक दिव्यांग मेहता यांना पायाला गोळी लागली आहे.या घटनेनंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत ऐकून अडीच किलो सोनं चोरीला गेल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर लुटारूनी दुचाकीवर पळ काढला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे.

भर दुपारी लुटारू शिरले दुकानात

सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड च्या रहाटणी परिसरातील पुणेकर ज्वेलर्स येथे आज दुपारी एकच्या सुमारास पाच लुटारू या ठिकाणी आले होते. या दुकानात शिरून त्यांनी दुकानाचे शटर लावले. दुकानदाराला धमकावत तब्बल अडीच किलो सोनं लंपास केलं आहे. दोन दुचाकीवरून हे पाच लुटारू आले होते. या लुटारूंकडे बंदूक होती. बंदुकीचा धाक दाखवून बॅगेत सोन्याचे दागिने भरण्यास सांगितले. परंतु, दुकान मालक दिव्यांग यांनी प्रतिकार केला याच झटापटीत त्यांच्या पायाला गोळी लागली. आरडा ओरडा झाल्यानंतर लुटारूनी दुचाकीवर धूम ठोकली. दरम्यान,दुकानातील सीसीटीव्हीचे सेटपच चोरांनी लंपास केले. त्यामुळे वाकड पोलिसांसमोर चोरांना शोधण्याचे आव्हान आहे.

- Advertisement -

दिशाभूल करण्यासाठी केली युक्ती

पुणेकर ज्वेलर्सच्या आत तीन जण गेल्यानंतर दोघेजण शेजारी असलेल्या दुकानदाराची दिशाभूल करण्यासाठी त्यांना वेगवेगळे वस्तू मागत होते. परंतु,गोळीबाराचा आवाज येताच त्यांनी साथीदारांसह धुम ठोकली आहे. प्रत्यक्षदर्शी यांनी तशी माहिती दिली आहे.त्यांनी रुग्णवाहिकेला फोन करून तातडीने बोलावून घेतले. तसेच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात पाच जणांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -