corona vaccine : भारतात कोरोनाच्या दोन लसींना आरोग्य मंत्रालयाची मंजुरी

corona vaccine : भारतात कोरोनाच्या दोन लसींना आरोग्य मंत्रालयाची मंजुरी

भारतात कोरोनाच्या आणखी दोन लसींना आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. कोवोव्हॅक्स आणि कोर्बेव्हॅक्स या दोन लशींना आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. कोरोना विरूद्धची लढाई आणखीन बळकट आणि सक्षम करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. १५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी १ जानेवारीपासून लसीकरणासाठी सुरूवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना काळात लढणारे कोरोना योद्धा म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा बुस्टर डोस दिला जाणार आहे. लसींची कमकरता आणि पुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आणखी दोन नवीन लसींना भारताता आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोना विरूद्ध लढण्यास अधिक मदत होणार

कोव्हॅक्सिन हे लहान मुलांसाठी असणार आहे. तर कोर्बेव्हॅक्स ही नवीन लस असून भारतीय कंपनी स्वदेशी बनावटीची ही लस आहे. हैदराबाद स्थित या कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. बायोलॉजिकल ई असं या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे हे देशात तयार झालेलं तीसरं व्हॅक्सीन आहे. तसेच कोरोनावरील मोलन्युपिरावीर गोळीलाही मान्यता देण्यात आलेली आहे. एखाद्या रूग्णांची परिस्थिती खालावल्यानंतर हे औषध डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाकडून तीन लसींना मान्यता दिल्यामुळे कोरोना विरूद्ध लढण्यास अधिक मदत होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली होती. याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदर पुनावाला यांनी ट्विट देखील केलं आहे.


हेही वाचा : Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींना कोरोनाची लागण, तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल


 

First Published on: December 28, 2021 12:18 PM
Exit mobile version