राजस्थानात गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, 6 जण जखमी

राजस्थानात गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, 6 जण जखमी

गेम खेळताना मोबाईलचा स्पोट झाल्याने 6 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. राजस्थानच्या (Rajasthan) चुरू जिल्ह्यातील साहवा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. अनिकेत (14) असे मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाचे नाव आहे. तसेच, भूमिका (12) आणि रामवती (40) या आगीत गंभीर जखमी झाल्या असून, त्यांचा बचाव करणारे सूरज आणि अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि या स्फोटात जखमी झालेले नागरिक ट्रकने प्रवास करत होते. या ट्रकमध्येच अनिकेत मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेली गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर स्फोटामुळे घाबरलेल्या अनिकेतने मोबाईल खाली टाकला. तेव्हा मोबाईल थेट गादीवर पडला आणि गादीने पेट घेतला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल्या इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्रा, स्फोटामुळे मोबाईलला लागलेली आग भीषण असल्यामुळे 6 जण जखमी झाले आहेत.

आग लागल्यानंतर ट्रकमधील काही नागरिकांनी स्थानिकांच्या मदतीने आग विजवली. या घटनेत जखमी झालेल्यांना साहवा सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. हे दिल्लीच्या दक्षिणपुरी भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुरुवात महाराष्ट्रापासून करा, प्रियंका चतुरवेदी मोदींवर टीका

First Published on: August 15, 2022 4:14 PM
Exit mobile version