देशातील एम्स रुग्णालयांच्या नावात होणार बदल; ‘या’ आधारे ठेवलं जाणार नवं नावं

देशातील एम्स रुग्णालयांच्या नावात होणार बदल; ‘या’ आधारे ठेवलं जाणार नवं नावं

केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील सर्व 23 एम्स रुग्णालयांची नावं बदण्याता निर्यण घेतला आहे. यामुळे ही 23 एम्स रुग्णालये आता स्थानिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक घटना (Heroes, freedom fighters, historical events) किंवा त्या प्रदेशातील स्मारके किंवा त्यांची विशिष्ट भौगोलिक ओळख असलेल्या गोष्टीवरून ओळखली जाणार आहे. यासाठी केंद्रानेएक प्रस्ताव देखील केंद्राने तयार केला आहे. ज्यामध्ये दिल्लीसह 23 एम्स रुग्णालयांना प्रादेशिक भागातील वीर, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक घटना किंवा त्या प्रदेशातील स्मारके किंवा त्यांची विशिष्ट भौगोलिक ओळख असलेल्या गोष्टीवरून त्यांच्या आधारावर खास नवं नावं देण्याची योजना आखण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयने या नावांबाबत भारतातील 23 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकडे (एम्स) सूचना मागवल्या होत्या. ज्यानंतर बहुतेक एम्सकडून नावांची यादी सादर करण्यात आली आहे

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सध्या काही एम्स रुग्णालये कार्यरत आहेत. तर काही प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केली जात आहेत. मात्र या एम्स रुग्णालयांना त्यांच्या सर्वसामान्य नावानेच किंवा राज्याप्रमाणेच फक्त ओळखले जाते. किंवा त्या विशिष्ट ठिकाणाच्या नावाने ओखळले जाते. उदा. दिल्लीतील एम्स रुग्णालयाला दिल्ली एम्स रुग्णालय या नावाने ओळखले जाते. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व 23 एम्स रुग्णालयांना विशिष्ट नावे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीसह 23 एम्सचा समावेश आहे. यात कार्यरत असणारी अंशतः कार्यरत असणारी किंवा बांधकाम चालू असलेल्या एम्सचाही समावेश आहे.

माहितीनुसार, केंद्र सरकारने एम्सला विशेष नाव देण्यासाठी विविध संस्थांकडून सूचना मागवल्या होत्या. ज्यामध्ये संस्थांना येथील स्थानिक प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, संस्था असलेल्या ठिकाणावरील प्रदेशाची विशिष्ट भौगोलिक ओळख आणि प्रमुख ऐतिहासिक घटना किंवा स्मारके यांवरून नाव ठरवण्यास सांगितले होते. यावर 23 एम्सपैकी बहुतांश एम्सकडून नावांची यादी सादर करण्यात आली. यात प्रमुख आरोग्य संस्थांनी सुचविलेल्या नावांपैकी एम्सने तीन ते चार नावांची निवड केली आहे.

प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात सहा नवीन एम्स रुग्णालये स्थापन होणार आहेत. यात बिहार (पाटणा), छत्तीसगड (रायपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), ओडिशा (भुवनेश्वर), राजस्थान (जोधपूर) आणि उत्तराखंड (ऋषिकेश) मंजूर देण्यात आली आहे. दरम्यान 2015 ते 2022 दरम्यान स्थापन झालेल्या 16 एम्स पैकी 10 संस्थ्यांमध्ये एमबीबीएस आणि बाह्यरुग्ण विभाग सेवा सुरु करण्यात आली आहे. तर इतर दोन संस्थांमध्ये फक्त एमबीबीएसचे वर्ग सुरु आहेत. याशिवाय उर्वरित 4 संस्थांची तयारी सुरु आहे.


एअरटेलची 5G सेवा याच महिन्यात होणार सुरू; ‘या’ शहारातून मिळणार पहिली सुविधा

First Published on: August 22, 2022 1:32 PM
Exit mobile version