घरदेश-विदेशएअरटेलची 5G सेवा याच महिन्यात होणार सुरू; 'या' शहारातून मिळणार पहिली सुविधा

एअरटेलची 5G सेवा याच महिन्यात होणार सुरू; ‘या’ शहारातून मिळणार पहिली सुविधा

Subscribe

भारतात 5G सेवा लवकरचं सुरु होणार आहे. यामुळे भारतीयांना आता 5G स्मार्टफोनवर 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे. टेलीकॉम ऑपरेटर एअरटेलची 5G सेवा याच महिन्यात सुरू होणार आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. ऑगस्टमध्ये 5G सेवा सुरू होईल, असे कंपनीने सांगितले होते.

या महिन्यापासून ग्राहक एअरटेलच्या 5G सेवेचा आनंद घेऊ शकतात. एअरटेलने 5G स्पेक्ट्रमसाठी सुमारे 43,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. एअरटेलने 5G सेवा सुरू होण्याच्या तारखेबद्दल माहिती दिलेली नाही. परंतु कंपनीचे सीईओ गोपाल विट्टल यांनी आधी सांगितले होते की, ऑगस्ट महिन्यातच 5G सेवा सुरू केली जाईल.

- Advertisement -

कोणत्या शहरांना मिळणार 5G सेवा?

Airtel ची 5G सेवा या महिन्यात लॉन्च झाली याचा अर्थ असा नाही की 5G सेवा देशभरात उपलब्ध होईल. याआधी ते फक्त मेट्रो शहरांमध्येच दिले जाईल. जिथे 5G पायलट चाचणी यशस्वी झाली आहे तिथे ही सेवा मिळू शकते.

एअरटेलची 5G सेवा या वर्षाच्या अखेरीस टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये उपलब्ध होईल. भारतभर एअरटेलच्या 5G सेवेसाठी मार्च 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

- Advertisement -

भारतात एअरटेल 5G बँड

Airtel ने 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100MHz (n1), 3300 MHz (n78), आणि 26 GHz (n258 mmWave) बँड विकत घेतले आहेत. यासाठी कंपनीने सुमारे 43,038 कोटी रुपये खर्च केले.

भारतातील Airtel 5G ला सपोर्ट करणारी शहरे

एका अहवालानुसार, एअरटेल 5G सेवा प्रथम दिल्ली, गांधीनगर, बेंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, कोलकत्ता, लखनौ, मुंबई आणि पुणे येथे सुरू केली जाईल. म्हणजेच पहिल्या 13 शहरांमध्ये हे लॉन्च केले जाईल. नंतर ते टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये रिलीज होईल.

Airtel 5G ची किंमत किती असेल? 

Airtel 5G च्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याची किंमत 4G पेक्षा जास्त असू शकते. त्याच्या प्लॅनची किंमत भारतात 500 रुपयांपासून सुरू होऊ शकते. सध्या Airtel 4G प्लॅनची किंमत सुमारे 300 रुपयांपासून सुरू होते.


हेही वाचा : रोहित पवार आता मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर; बारामती अॅग्रोबाबत केलं ट्विट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -