पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता

पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता

पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता

पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यावर मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहे. या दौऱ्यादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच जगभरातील नेत्यांसोबत बैठक करणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील जवळपास १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेत येणार आहेत. यात पंतप्रधान मोदींबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचाही समावेश आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.

मोदी आणि यांच्यात २४ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत- अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.

२३ सप्टेंबर रोजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. तर २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधितही करणार आहेत. यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची पहिल्यांदाच भेट घेणार आहे. त्यामुळे बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. क्वाड देशांच्या नेत्यांना पहिल्यांदाच बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेटणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले आहे. या बैठकीत अफगाणिसातान आणि सीमा भागातील अन्य मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह सीमापार दहशताद आणि कट्टरता वाद यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होऊ शकते. पुढील बुधवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इतर देशांच्या नेत्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक ऑनलाईन बैठक घेणार आहेत. युएनजीसीच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मोदींना धन्यवाद देणारे हिंदी ट्वीट 

अमेरिकाच्या दौऱ्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी काल फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह फोनवर बातचीत केली. मोदींसह झालेल्या संभाषणानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंदीमध्ये ट्वीट करत मोदींचे आभार मानले आहेत. मॅक्रॉन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, नमस्ते, प्रिय सहभागी, प्रिय मित्र, आमच्या सहभागाला बळकटी देण्याकरिता धन्यवाद. भारत आणि फ्रान्स पॅसिफिक सहकार्य आणि सामायिक मूल्ये बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहेत. ही भागीदार पुढेही सुरु राहिल.


First Published on: September 22, 2021 9:16 AM
Exit mobile version