कर्नाटक निवडणुकीत नाही चालणार मोदी ‘मॅजिक’? ओपिनियन पोलनुसार काँग्रेस वरचढ

कर्नाटक निवडणुकीत नाही चालणार मोदी ‘मॅजिक’? ओपिनियन पोलनुसार काँग्रेस वरचढ

नवी दिल्ली : कर्नाटक राज्याच्या निवडणुका बुधवारी (२९ मार्च) जाहीर झाल्या आहेत. एकूण २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात या निवडणुका पार पडणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे आणि १३ मे रोजी निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेस, भाजपा आणि जेडीएस यांच्यात गेल्या २० वर्षापासून तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यावेळीही तिन्ही पक्षात मुख्य लढाई होणार असून कोण वरचढ ठरणार हे निकालाच्या दिवशीच समजेल.

कर्नाटकचा राजकीय इतिहास पाहिला तर गेल्या ४ दशकापासून कुठलेही सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले नाही. त्यामुळे भाजपासाठी कर्नाटकमध्ये यावेळी सत्ता मिळवणे मोठे आव्हान असणार आहे. कर्नाटक निवडणुकीबद्दल बोलायचे तर ५ मुद्दे प्रामुख्याने प्रचारात असणार असून यामध्ये कर्नाटक निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारची विकास योजना, आरक्षण, जातीय समीकरण, काँग्रेसची गॅरंटी स्कीम, एंटी इन्कंबेंसीचा समावेश आहे. याशिवाय लोकांना टीव्ही, स्मार्ट फोन, ग्राइंडरसारख्या मोफत वस्तू देण्याचा प्रयत्नही या निवडणुकीत होताना दिसणार आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस या पक्षांचे प्रमुख चेहरे निवडणुकीचा प्रचार करताना दिसतील. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, येदियुरप्पा, बसवराज बोम्मई, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धारमैया, डिके शिवकुमार, जेडीएस नेते एचडी देवेगौडा, एचडी कुमारस्वामी याचा समावेश आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची आकडेवारी?
1. भाजपाला २०१३ विधानसभा निवडणुकीत १९.९ टक्के मते मिळाली होती, तर २०१८ निवडणुकीत ३६.२ टक्के मिळाली होती. याउलट २०१९ लोकसभा निवडणूक ५१.७ टक्के मुते मिळाली होती.
2. काँग्रेस पक्षाला २०१३ विधानसभा निवडणुकीत ३६.६ टक्के मते, तर २०१८ निवडणुकीत ३८ टक्के मते मिळाली होती. परंतु २०१९ लोकसभा निवडणूकीत ३२.१ टक्के कमी मते मिळाली होती.
3. जेडीएस पक्षाला २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत २०.२ टक्के मते, तर २०१८ निवडणुकीत १८.४ टक्के मते मिळाली होती. परंतु २०१९ लोकसभा निवडणूक ९.७ टक्के जेडीएसला कमी मते मिळाली होती.

विधानसभेत कोणत्या पक्षाचा दबदबा?
भाजपा – १०४
काँग्रेस – ८०
जेडीएस – ३७

ओपिनियन पोलच्या आकडेवारीमुळे काँग्रेस आशादायी
एबीपी सी-व्होटरचे सर्वेक्षण
भाजप – ६८ ते ८०
काँग्रेस – ११५ ते १२७
जेडीएस – २३ ते ३५
अन्य – ० ते २

First Published on: March 30, 2023 11:28 AM
Exit mobile version