2022 मध्ये 2.25 लाख लोकांनी सोडलं भारतातील नागरिकत्व; परराष्ट्रमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

देशातील 16 लाखांहून अधिक भारतीयांनी 2011 पासून आत्तापर्यंत भारतीय नागरिकत्व सोडल्याची माहिती आज राज्यसभेत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सरकारी आकडेवारीचा हवाला देत जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी 2011 पासून ते आत्तापर्यंत किती भारतीय नागरिकांनी आपलं नागरिकत्व सोडलं याची आकडाही पद्धतशीरपणे मांडली आहे.

2022 मध्ये सर्वात कमी भारतीयांनी सोडलं नागरिकत्व

2011 पासून 1.6 लाखाहून अधिक भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडलं आहे, ज्यात गेल्या वर्षी 2 लाख 25 हजार 620 नागरिकांची भर पडली आहे. हा या कालावधीतील सर्वात मोठा आकडा होता, तर 2020 सर्वाधिक कमी म्हणजे 85,256 भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडले, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 1,31,489 होती, जी 2016 मध्ये 1,41,603 पर्यंत पोहचली, तर 2017 मध्ये 1,33,049 लोकांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले. दरम्यान 2018 मध्ये ही संख्या 1,34,561 होती, तर 2019 मध्ये 1,44,017, याशिवाय 2020 मध्ये 85,256 आणि 2021 मध्ये 1,63,370 भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

2011 पासून 16,63,440 भारतीयांनी सोडलं नागरिकत्व

मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये ही संख्या 2,25,620 वर पोहचली आहे. जयशंकर यांनी संदर्भ देत म्हटवले की, 2011 चा आकडा 1,22,819 होता, तर 2012 मध्ये 1,20,923, 2013 मध्ये 1,31,405 आणि 2014 मध्ये 1,29,328 होता. 2011 पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांची एकूण संख्या 16,63,440 आहे.

5 भारतीयांना स्वीकरालं UAE चं नागरिकत्व

परराष्ट्र मंत्र्यांच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पाच भारतीय नागरिकांनी यूएईचे नागरिकत्व स्वीकारलं आहे. जयशंकर यांनी भारतीयांनी ज्या देशांच नागरिकत्व आत्तापर्यंत स्वीकारलं आहे, अशा 135 देशांची यादी जाहीर केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या वेळापत्रक 

First Published on: February 9, 2023 9:48 PM
Exit mobile version