घरमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारीचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारीचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या वेळापत्रक 

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी ( शुक्रवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या अनेक कार्यक्रमाचं उद्धाटन होणार आहे. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर  या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. पीएम मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता मुंबईतून तीन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.

यानंतर सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प हे दोन रस्ते प्रकल्प पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करतील. यानंतर मोदी मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही करतील.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला वंदे भारत ट्रेनच्या उद्धाटन करून  मरोळमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या या संपूर्ण दौऱ्यानिमित्त मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून मंगळवारी त्यांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवले. याबाबत वरिष्ठांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक? 

दुपारी 2.10 वाजता :  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल होणार

- Advertisement -

मुंबई विमानतळावर हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार

दुपारी 2.45 वाजता: सीएसएमटी स्थानकावर पोहचतील.

दुपारी 2.48 वाजता : पंतप्रधान मोदी प्लॅटफॉर्म 18 वर वंदे भारत ट्रेनजवळ जातील.

दुपारी 2. 55 च्या दरम्यान : वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. साधारण 3 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल.

मोदींना यासंदर्भात 1 मिनिटांचं प्रेसेंटेशन दिलं जाईल

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये लहान मुलांसोबत ते 7 मिनिटं गप्पा मारतील.

यानंतर पुन्हा मोदी प्लॅटफॉर्म 18 वरून वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरती पोहचतील.

सीएसएमटी स्थानकावर साधारण 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल.

दुपारी 3.55 वाजता : मोदी सीएसएमटीवरून आयएनएस शिक्रावर पोहचतील आणि हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.

दुपारी 4.20 वाजता :  मुंबई विमानतळावर दाखल होतील. मुंबई विमानतळ ते मरोळ असा प्रवास ते कारने करणार आहेत.

दुपारी 4.30 वाजता : मोदी मरोळच्या कार्यक्रमा स्थळी पोहोचतील  आणि ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन करतील.

सायंकाळी 5.50 वाजता : मरोळहून पुन्हा कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता : मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.


बुलेट ट्रेन भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; हायकोर्टाने फेटाळली गोदरेजची याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -