माता न तू वैरिणी; आईनेच केली ९ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या

माता न तू वैरिणी; आईनेच केली ९ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या

(फोटो प्रातिनिधिक आहे)

आई मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. आपल्या पोटच्या ९ महिन्याच्या अपंग चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी यशोदा किरण छेडा या महिलेला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह कळव्याच्या खाडीत फेकून दिला असल्याची कबूली तिने ठाणे नगर पोलिसांना दिली आहे.

ठाण्यामधील लोकमान्य नगर येथे यशोदा किरण छेडा यांचे कुटुंब राहते. यशोदा यांना ९ महिन्यापूर्वी मुलगी झाली. पण ती अपंग असल्यामुळे तिचा सांभाळ कशाला करायचा? असा प्रश्न यशोदाला सतावत होता. या निराशेतूनच यशोदाने १८ मे रोजी आपल्या मुलीचा गळा दाबून खून करुन तिचा मृतदेह कळव्याच्या खाडीत फेकून दिला. मुलीच्या हत्येनंतर यशोदाला तिच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. त्यामुळे तिनं थेट पोलीस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली. तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. तसेच मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

First Published on: June 5, 2018 6:28 AM
Exit mobile version