मुकेश अंबांनी दोन वर्षे पगाराविनाच, का ते वाचा!

मुकेश अंबांनी दोन वर्षे पगाराविनाच, का ते वाचा!

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबांनी (World Famous Industrialist Mukesh Ambani) यांच्या पगाराबाबत नेहमीच चर्चा रंगते. पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आपल्या कंपनीतून पगारच घेतलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आणि अध्यक्ष (Chairman) म्हणून त्यांनी कंपनीसाठी फुकट काम केल्याचा अहवाल समोर आला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे व्यवहार सुरळती राहण्याकरता अंबांनी यांनी कंपनीकडून पगार न घेण्याचा निर्णय जून २०२० मध्ये घेतला होता. (Mukesh ambani salary showing zero salary in reliance industry)

मार्च २०२० पासून जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला. भारतही या कोरोनाच्या ज्वाळेमध्ये होरपळला गेला. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. व्यवहार सुरळीत राहावेत याकरता मुकेश अंबांनी यांनी जून २०२० मध्ये स्वेच्छेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात वेतन घेतले नाही. मुकेश अंबांनीचा पगार त्यावेळी शुन्य (Zero Salary) दाखवण्यात आला होता. दरम्यान, हाच निर्णय त्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीही कायम ठेवला आहे. त्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षातही वेतन घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ईपीएफओच्या २८ कोटी खातेधारकांची माहिती लीक, तुमचंही यादीत नाव नाही ना?

शुन्य पगारानुसार त्यांनी या दोन वर्षात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदासाठी रिलायन्सकडून कोणतेही भत्ते, सेवानिवृत्ती लाभ, कमिशन आणि स्टॉक पर्यायांचा लाभ घेतला नाही.

कोणाला किती पगार असतो?

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे वेतन २००८-०९ या पासून १६ कोटी ठरवण्यात आले होते. तसेच, त्यांचे चुलत भाऊ निखिल आणि हेतल मेसवानी (Hetal Meswani) यांचा पगार या काळात २४ कोटी रुपये होता. तर, कार्यकारी संचालक पीएमएम प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या पगारात किंचित घट झाली आहे.

हेही वाचा – ५जी स्पेक्ट्रम लिलाव; पहिल्याच दिवशी सरकार मालामाल, अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली

नीता अंबांनीनाही मिळतात कोट्यवधी रुपये

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या कंपनीच्या मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांना यंदा सिटिंग फी म्हणून ५ लाख तर कम्पेनसेशन म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर, गेल्यावर्षी सिटिंग फी म्हणून ८ लाख रुपये तर, कम्पेनसेशन म्हणून १.६५ कोटी रुपये देण्यात आले होते.

First Published on: August 8, 2022 3:21 PM
Exit mobile version