मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Zakiur Rehman Lakhvi ला १५ वर्षांची शिक्षा!

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Zakiur Rehman Lakhvi ला १५ वर्षांची शिक्षा!

मुंबईच्या २६/११चा मास्टरमाईंड झाकीर रहिमन लखवीला बेड्या

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी झकीउर रेहमान लखवीला (Zakiur Rehman Lakhvi) पाकिस्तानी न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. Terror Funding अर्थात दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप लखवीवर होता. या प्रकरणात तो दोषी आढळल्यानंतर त्याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने अटक केली होती. त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी कोट्यवधी भारतीयांची इच्छा होती. मात्र, त्याला अवघ्या १५ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, याआधीचा पाकिस्तानचा अनुभव पाहाता लखवी फार काळ तुरुंगात राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार सांगतात.

६१ वर्षीय लखवी २००८मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये त्याच्यावर डिस्पेन्सरीच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये लखवीसारख्या दहशतवाद्याला संरक्षण मिळत असल्याचा निषेध करत अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाकिस्तानवर निर्बंध लादले होते. पाकिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांचा निषेध करत FATA नं देखील पाकिस्तानवर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते. या दबावाखाली आल्यामुळेच अखेर पाकिस्तानकडून लखवीला अटक करून त्याच्याविरोधात खटला चालवला गेला असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: January 8, 2021 5:48 PM
Exit mobile version