केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन लस कधी घेणार ? अखेर उत्तर आले समोर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन लस कधी घेणार ? अखेर उत्तर आले समोर

कोरोनाच्या लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरूवात आज झाली. या मोहिमेच्या निमित्ताने अनेकांनी मला विचारले की तुम्ही कधी लस घेणार ? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी उत्तर देत याबाबतचा खुलासा केला आहे. देशभरात आज कोविड योद्ध्यांना प्राधान्याने लस देण्याची मोहीम सुरू झाली. या मोहिमेअंतर्गतच प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या प्राधान्य क्रमानुसारच मलाही कोरोनाची लस मिळेल असे डॉ हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेच्या निमित्ताने या लशीच्या साईड इफेक्टबाबत जे गैरसमज झाले आहेत, ते गैरसमज कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्येक राज्यात कम्युनिकेशनचे मॉडेल यासाठी विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या लसीमुळे होणारा साईड इफेक्ट्सचा अपप्रचाराने चिंतीत होण्याची गरज नाही. त्यासाठीच एखादा चांगला प्रचाराचा कार्यक्रम हाती घेऊन राज्यातील जनतेचा आत्मविश्वास वाढवण्यात यावा असे आवाहन त्यांनी देशभरातील विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना आणि आरोग्य सचिवांना केले आहे. आपण गेल्या एक वर्षात काही असे क्षण पाहिले आहेत, जिथे कोरोना विरोधातील लढाईत समर्पित डॉक्टर, नर्सेस, कोविड वॉरियरला प्राण देताना पाहिले आहे. सध्या कोरोनाच्या विरोधातील सुरू असलेली लढाई पाहता कोरोनाविरोधातील युद्ध समाप्तीकडे नेण्याचे उदिष्ट आपल्यासमोर असायला हवे. देशात याआधीच आपण पोलिओ, रूबेला यासारख्या लसीकरणाच्या मोहिमांच्या माध्यमातून आपली क्षमता दाखवली आहे. आज सुरू झालेला कोरोना विरोधातील लसीकरणाचा कार्यक्रम हा जगातील मोठा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले.

मला कोरोनाची लस कधी घेणार असे अनेकदा विचारण्यात येते. माझा टर्न जेव्हा असेल म्हणजे ५० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना जेव्हा लस देण्यात येईल तेव्हा मलाही ही लस मिळेल. त्यामुळे मीदेखील लसीकरणाच्या टप्प्यासाठी वाट पाहत आहे. माझा टर्न आल्यानंतर मी लस घेईन असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

First Published on: January 16, 2021 6:58 PM
Exit mobile version