का मानले पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार?

का मानले पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार?

नरेंद्र मोदी ( फोटो सौजन्य . युट्युब. कॉम )

ग्राम स्वराज्य अभियान यशस्वी करून दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. अधिकारी, मंत्री, कायदेतज्ञ्ज, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रुप या सर्वांकडून झालेल्या सहकार्यबद्दल मोदींनी आभार मानले. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद देत स्वराज्य अभियान यशस्वी केल्याबद्दल आभार मानले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. १६८५० गावांमध्ये १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान स्वराज्य योजना यशस्वीपणे राबवणे ही डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असल्याचे मोदींनी म्हटलंय.

काय आहे ग्राम स्वराज्य योजनेचे यश?

स्वराज्य योजनेतंर्गत ७ लाख ५३ हजार उजाला योजनेचे कनेक्शन,५,०२,४३४ घरांना सौभाग्य योजनेतंर्गत वीज जोडणी,१६,६८२ गावांमध्ये २५ लाख ह हजार एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले. तसेच मिशन इंद्रधनुष अंतर्गत ६,६४,३९८ मुले आणि ४२,७६२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. शिवाय प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेतंर्गत २६,१०,५०६ , प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेतंर्गत १६,१४,३८८ तर जन धन योजनेतंर्गत २०,५३,५९९ जणांना नव्याने जोडण्यात आले. तसेच स्वराज्य योजनेतंर्गत केंद्र सरकारच्या ७ योजना या यशस्वीरित्या राबवल्या गेल्या. ‘उत्तम प्रशासनाचे हे यश’ असल्याचे देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक भान, जागृकता सारख्या गोष्टी समाजात रूजवण्यास देखील मदत झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

First Published on: May 24, 2018 11:33 AM
Exit mobile version