राहुल, सोनिया गांधींना १०० कोटींची नोटीस

राहुल, सोनिया गांधींना १०० कोटींची नोटीस

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये आता इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये दोघांनी १०० कोटी भरावेत असं म्हटलं आहे. राहुल गांधी यांचे २०११- १२ मधील उत्पन्न १५५. ४१ कोटी रुपये तर सोनिया गांधी यांचे उत्पन्न १५४. ९६ कोटी रुपये इतके होते. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील कमाईची पुन्हा चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने डिसेंबरमध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर, राहुल गांधी यांचे २०११- १२ मधील उत्पन्न १५५. ४१ कोटी रुपये तर सोनिया गांधी यांचे उत्पन्न १५४. ९६ कोटी असल्याचे इनकम टॅक्स विभागाच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता १०० कोटी रूपये भरा अशी नोटीस इनकम टॅक्स विभागानं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना बजावली आहे.

First Published on: January 9, 2019 11:09 AM
Exit mobile version