अंतराळात भारतीय महिलांचा डंका

अंतराळात भारतीय महिलांचा डंका

अंतराळात भारतीय महिलांचा डंका

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अत्याधुनिक रोव्हर पर्सीवरेन्स मंगळावर पाठवत नावा विक्रम रचला. अमेरिकेच्या या ‘रोव्हर´ ने मंगळावर खडतर प्रवास करत यशस्वीरित्या लॉन्डिंग केले. अमेरिकेच्या या यशाचा भारतीयांना देखील अभिमान आहे. कारण हे अभियान यशस्वी करण्यामध्ये भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रोव्हर यशस्वीरित्या लँड करून टचडाउन कन्फर्म होईपर्यंत त्याची सर्वात पहिली माहिती देणाऱ्या फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन या होत्या. नासाने रोव्हरच्या लँडिंगनंतर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये भारतीय पद्धतीने माथ्यावर टीकली लावणारी एक महिला इंजिनियर दिसली होती. ती इंजियर म्हणजे भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन. वैज्ञानिक, इंजिनियरिंग आणि मिसाइल डेव्हलमेंट क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या भावी पिढीसाठी डॉ. स्वाती मोहन एक यशस्वी उदाहरण बनत आहे. स्वाती मोहन नासामध्ये गाइडेन्स, नेव्हीगेशन आणि कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती एक वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांचे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले. उत्तरी व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डीसी मेट्रो क्षेत्रात त्यांचे पालन-पोषण झाले. कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल अँड एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये त्यांनी बीएससी आणि एरोनॉटिक्स, अ‍ॅस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटी आणि पीएचडी केली आहे. स्वाती सुरुवातीपासूनच नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत मार्स रोव्हर मिशनची सदस्य आहेत. यासह, त्या नासाच्या विविध महत्त्वपूर्ण अभियानामध्ये सहभागी झाल्या आहेत.

वैज्ञानिक क्षेत्रात आणखी एका यशस्वी भारतीय महिलेचे नाव पुढे येते, ते म्हणजे चेन्नईतील इलेक्ट्रॉनिक्स सिस्टट इंजिनियर मुथैय्या वनिता. गेली तीन दशके वनिता या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये वैज्ञानिक इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. जगप्रसिद्ध मॅग्जिन फोर्ब्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वनिता यांनी आपला अंतराळ संशोधनातील प्रवास सांगितला आहे. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, इंजिनियरिंग क्षेत्रातील आवडीमुळे मला करियरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. ज्यावेळी मला ISROमधून चांद्रयान २ या मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर पोस्टची ऑफर आली त्यावेळी मला विश्वासच बसत नव्हता. या संधीला मी लगेच होकार दिला. यानंतर अनेक संधी मला मिळत गेल्या आणि पुढे जात राहिली. ज्यावेळी आयुष्या कठीण परिस्थित असते. त्यावेळी ही परिस्थिती आपल्याला जोमाणे लढण्याची ताकदही देत असते. असे वनिता सांगतात.


हेही वाचा- होळीमुळे होऊ शकतो ‘कोरोनाचा स्फोट’, तज्ज्ञांचा इशारा

 

First Published on: March 2, 2021 6:06 PM
Exit mobile version