प्रसिद्ध लेखक नामवर सिंह यांचे निधन

प्रसिद्ध लेखक नामवर सिंह यांचे निधन

लेखक नामवर सिंह

प्रसिद्ध लेखक नामवर सिंह यांचे काल रात्री नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. मंगळवारी रात्री ११.५० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दिल्लीतील लोधी रोडवरील स्मशानभूमीत त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोण होते नामवार सिंह

नामवार सिंह यांना मागील काही महिन्यांनापासून ब्रेन हॅमरेजचा त्रास असल्याची माहिती समोर आली. नामसिंह यांचा जन्म २८जुलै १९२७ रोजी वाराणसीमधील एका गावात झाला होता. हिंदी साहित्यात त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले. साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९५९ मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. छायावाद, इतिहास आणि आलोचना,कहानी-नयी कहानी, दूसरी परंपरा की खोज अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत.

First Published on: February 20, 2019 2:05 PM
Exit mobile version