Navratri 2021: पंतप्रधान मोदींनी दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि समृद्धी येवो यासाठी केली प्रार्थना

आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2021) सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्यासह देशभरातील प्रार्थनास्थळे भविकांसाठी खुली करण्यात आल्याने भाविकांमध्ये नवरात्र साजरा करण्यासाठी मोठा उत्साह पहायला मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister narendra Modi) यांनी देखील नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात. मोदींनी ट्विटरवर देवीची पूजा करत असतानाचा फोटो शेअर करत ‘प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, सर्वांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा. येणारे नवरात्रीचे दिवस आपण जननी मातेच्या पूजेसाठी समर्पित करणार आहोत. हा नवरात्रौत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो ही पार्थना’. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पुजा केली जाते. त्याचनिमित्ताने देवीला समर्पित स्तुती मोदींनी शेअर केली आहे.

मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदींनी सफेद रंगाचे कपडे आणि खांद्यावर लाल रंगाची बांधणीची ओढणी परिधान केल्याचे दिसत आहे. हातात देवीची आरती घेऊन मनोभावे पुजा करताना मोदी दिसत आहेत.

हेही वाचा – Temple Reopen: राज्यातील मंदिरे आजापासून भविकांसाठी खुली, मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचे दर्शन

First Published on: October 7, 2021 9:46 AM
Exit mobile version