विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-सोनिया गांधी भेट!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-सोनिया गांधी भेट!

शरद पवार आणि सोनिया गांधी

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज, मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तसेच राज्यातील राजकीत समीकरणांवर तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील युतीबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युतीने राज्यात ४८ पैकी ४१ जागा मिळवत मोठा विजय मिळवला. भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा जिंकण्यात यश आले. काँग्रेसला १ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वबळावर लढल्या होत्या. काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा जिंकता आल्या होत्या. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. नुकतेच शरद पवार यांनी सांगितले होते की, २४० जागांवर समझोता झाला आहे. आता त्याला अंतिम स्वरु देणे बाकी आहे. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे पक्षातून बाहेर पडणे सुरू आहे. तर भाजप आणि शिवसेनेत जोरात इनकमिंग सुरू आहे.

ज्योतिरादित्य सिंधियासोबतची बैठक रद्द 

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. भेटीदरम्यान मध्य प्रदेश राज्यतील राजकीय परिस्थिती तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा होणार होती.

हेही वाचा –

मेट्रोला नाही तर वृक्षतोडीला विरोध – आदित्य ठाकरे

First Published on: September 10, 2019 2:31 PM
Exit mobile version