घरमुंबईमेट्रोला नाही तर वृक्षतोडीला विरोध - आदित्य ठाकरे

मेट्रोला नाही तर वृक्षतोडीला विरोध – आदित्य ठाकरे

Subscribe

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आरे येथे उभारल्या जाणाऱ्या कारशेडबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या कारशेडसाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे कॉलनीतील सुमारे २६४६ झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. या आक्षेपाबाबत शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेत त्यांनी इतर तज्ज्ञ व्यक्तींसोबत आरेचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय ‘शिवसेनेचा विकास कामांना कधीच विरोध नाही. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे येथे २६४६ झाडे तोडून जे कारशेड तयार केले जात आहे, त्याला शिवसेनेचा विरोध आहे’, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी याअगोरही आरे मुद्द्यावरुन अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. ‘अधिकारी मुख्यमंत्र्यांना आरे संदर्भात चुकीची माहिती देत आहेत. आरेमध्ये फक्त उंदीर आहेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले जात आहे. मात्र, आरेमध्ये वन्यजीवन आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा – आरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ अशक्य!

- Advertisement -

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत होणाऱ्या वृक्षतोडीवर शिवसेनेसह पर्यावरण प्रेमी, मुंबईकर, सिनेकलाकार यांनी आक्षेप घेतला आहे. अनेकजण ‘सेव्ह आरे’ या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वृक्षतोडीच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. मात्र, आरे येथे वृक्षतोड केल्याशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार नसल्याची प्रतिक्रिया मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे. याशिवाय मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरे येथे कारशेड बांधणे सोयिस्कर असून आरे येथील कारशेड शिवाय मेट्रो प्रकल्प अशक्य आहे, असेही भिडे म्हणाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -