उपराष्ट्रपती पदासाठी NDAकडून जगदीप धानखर यांना उमेदवारी जाहीर

उपराष्ट्रपती पदासाठी NDAकडून जगदीप धानखर यांना उमेदवारी जाहीर

एकीकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीलाही रंग आला आहे. एनडीएकडून आज जगदीप धानखर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धानखर यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अकेर त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. (NDA declare their candidate for Deputy president Jagdeep Dhankhad)

हेही वाचा – उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर, 6 ऑगस्टला होणार मतमोजणी

११ ऑगस्ट रोजी देशाच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात आली. 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्जांची छाननी 20 जुलै रोजी होणार आहे. 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. आणि ६ ऑगस्टला मतमोजणीही होणार आहे.

उपराष्ट्रपतीच्या शर्यतीत मुख्तार अब्बास नक्वी, आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत होती. मात्र, एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानखर यांचं नाव पुढे केलं. १८९८ ते १९९१ मध्ये ते जनता दल पक्षातून लोकसभेचे खासदार होते. तसेच, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली आहे. ते मुळचे राजस्थानचे असून त्यांचं शिक्षण युनिर्व्हसिटी ऑफ राजस्थानमध्ये झालं आहे.

First Published on: July 16, 2022 8:03 PM
Exit mobile version