भारतात आढळला कोरोनाचा धोकादायक New Variant ; ७ दिवसात वजन होते कमी

भारतात आढळला कोरोनाचा धोकादायक New Variant ; ७ दिवसात वजन होते कमी

कोरोना व्हायरस सातत्याने आपले रुप बदलून अधिक धोकादायक होत आहे. येत्या काळात कोरोनाचे अनेक नवे व्हेरियंट समोर येणार आहेत. आता भारतात अजून एक धोकादायक व्हेरिएंट आढळला आहे. हा नवा व्हेरियंट इतका धोकादायक आहे की, यामुळे सात दिवस रुग्णांचे वजन घटते. यापूर्वी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळला होता. ब्राझीलमधून याअगोदरही एक व्हेरियंट भारतात आढळला आहे. त्यामुळे आता भारतात ब्राझीलहून दोन कोरोना व्हेरियंट आले आहेत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या नव्या व्हेरियंटचं नावं बी.१.१.२८.२ (B.1.1.28.2) असे आहे.

माहितीनुसार, परदेशातून आलेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. या नव्या व्हेरियंटची जिनोम सिक्वेसिंग आणि परीक्षण करण्यात आले आहे. कोरोनातून बरे होईपर्यंत दोन्ही जणांमध्ये लक्षणे दिसत नव्हती. परंतु यांच्या नमुन्याच्या सिक्वेसिंगनंतर बी.१.१.२८.२ व्हेरिएंट असल्याचे आढळले. कोरोनाच्या या नवा व्हेरियंटची उंदरांवरती चाचणी करण्यात आली. त्यापैकी तीन उंदरांचा मृत्यू शरीरातील अंतर्गत भागात संसर्ग वाढल्यामुळे झाला. तसेच वैज्ञानिकांच्या परीक्षणातून असे समोर आले की, या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यावर सात दिवसात त्याची ओळख पटते. रुग्णांच्य शरीरात ७ दिवसांच्या आत वजन घटते, इतका धोकादायक हा नवा व्हेरियंट आहे. तसेच डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हा नवा व्हेरियंट देखील अँटीबॉडीजची क्षमता कमी करतो. पण याचे इतर लक्षणे काय आहेत याबाबत माहित नाही आहे.

पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV)च्या वैज्ञानिकांनी सांगितले की, परदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये बी.१.१.२८.२ हा नवा व्हेरियंट आढळला. सध्या भारतात या व्हेरियंटचे अधिक रुग्ण नाही आहेत. तर डेल्टा व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – Live Update: जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ४० लाख पार


 

First Published on: June 7, 2021 8:51 AM
Exit mobile version