शंभरची नोट येणार नव्या रंगात!

शंभरची नोट येणार नव्या रंगात!

प्रातिनिधीक फोटो

बनावट नोटांना आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर 500 व 2000 रुपयांच्या नोटा वेगळ्या रंगात बनवण्यात आल्या. आता शंभर रुपयांची नोटही नव्या रंगात येणार आहे, अशी माहिती आयएसपी व सीएनपीतील मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली.

नोटबंदीनंतर अचानक आलेल्या नोटांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी शनिवारी येथील करन्सी नोट प्रेसची पाहणी केली. हा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. प्रेसची पाहणी करून शुक्ला त्वरीत रवाना झाले. यावेळी कामगार संघटनांच्या नेत्यांनी नोटांसाठी परदेशातून कागद आयात करावा लागत असल्यामुळे नेहरूनगर येथे उपलब्ध जागेवरच पेपर प्लॅण्ट तयार करण्याची मागणी केली. प्रेसमध्ये नोट छपाईसाठी लागणाèया मशीन या 1980 मधील असल्याने नोटांचा दर्जा हवा तेवढा चांगला मिळत नसल्याने नवे यंत्र लवकर उपलब्ध करून द्या, तसेच सायमंटन ऑफसेट आणि इंटग्लो मशिनची गरज असून त्यासाठी 2 मशीन खरेदी कराव्यात, अशाही मागण्या करण्यात आल्या.

पासपोर्ट मशिनला मंजुरी

नाशिकरोड इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पासपोर्ट तयार करण्यात येतात. यासाठी केंद्राने पासपोर्टसाठी मशिनला मंजुरी दिली आहे. त्यासोबतच ‘इन ले’ या मशीन खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

First Published on: May 29, 2018 11:43 AM
Exit mobile version