SBI-Canara Bankचे खातेदार आहात? तर वाचा ‘हे’ नवे नियम

SBI-Canara Bankचे खातेदार आहात? तर वाचा ‘हे’ नवे नियम

जर तुमच्या घरात कोणाचे भारतीय स्टेट बँक (SBI) किंवा कॅनरा बँक (Canara Bank/syndicate bank)मध्ये खाते आहे, तर या आठवड्यात बँकिंग बदल होत आहेत. या बदलांमुळे पैसे काढण्यावर जास्त चार्ज द्यावे लागू शकतात. इतकेच नाहीतर चेक बुक, एटीएमसंबंधित नियम आणि IFSC code कोड बदलत आहे. एसबीआयच्या BSBD Account holders साठी १ जुलैपासून नवीन सर्व्हिस चार्ज लागू होईल. यामध्ये एटीएममधून पैसे काढणे, चेक बूक, पैसे पाठवणे आणि दुसरा व्यवहारांचा यात समावेश आहे.

कुठे लागणार चार्ज?

१ जुलै २०२१पासून हे सर्व चार्ज लागू होणार आहेत. यानंतर ४ वेळा मोफत पैसे काढल्यानंतर चार्ज लागणार आहे. विशेष म्हणजे शाखा आणि एटीएम दोन्हीकडून होणारे व्यवहार एकत्र मोजले जातील. याप्रमाणे महिन्यांत ४ व्यवहार मोफत आहेत, मग बँकेतून करा किंवा एटीएममधून. पैसे काढण्यावर १५ रुपये+जीएसटी पेमेंट करावे लागणार आहे.

मोफत चेकबुक

एसबीआयच्या BSBD Account holders ना १० पानांच्या चेकबुकवर कोणताही चार्ज आकारला जाणार नाही आहे. परंतु यापेक्षा अधिक पानांच्या चेकबुकवर ४० रुपयांहून अधिक जीएसटी चार्ज लावले जाणार आहे. २५ पानांच्या चेकबुकवर ७५ रुपये चार्ज असेल. तर इमरजेंसी चेकबुकवर ५० रुपये आणि जीएसटी चार्जसह द्यावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना चार्जमुक्त ठेवले आहे.

Syndicate Bank नवा IFSC

Syndicate Bank ही Canara Bank मध्ये विलिन झाली आहे. त्यामुळे याची बँकिंग डिटेल बदलणार आहे. कॅनरा बँकने सांगितले आहे की, पूर्वीच्या सिंडिकेट बँक शाखांचा IFSC कोड १ जुलैपासून बदलला जाईल. ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS द्वारे फंड घेण्यासाठी नवीन कॅनरा IFSC (Canara IFSC Code)चा वापर करावा लागेल.

नवीन चेकबुक मिळेल

नवा IFSC कॅनरा बँकच्या वेबसाईटवर जावून (Canarabank.com/IFSC.Html ) किंवा कॅनरा बँकच्या कोणत्याही शाखेत जाऊन घेऊ शकता. पूर्वीच्या सिंडिकेट बँकच्या ग्राहकांना बदलेल्या IFSC आणि MICR कोडसोबत नवीन चेकबुक घ्यावे लागेल.

असा चेक करा शाखेचा नवा कोड

canarabank.com/IFSC.html यावर जा.

इथे तुमच्या भागातील डिटेल भरा. म्हणजेच तुम्ही कुठे राहता? त्याचा पीन कोड नंबर, कॉलनीचे नाव वैगेरे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या शाखेचा IFSC मिळून जाईल.

बँकेच्या शाखेत जाऊनही IFSC कोड मिळवू शकता.

First Published on: June 28, 2021 1:47 PM
Exit mobile version