चीनमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव! ६० जणं गंभीर आजारी तर ७ बळी!

चीनमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव! ६० जणं गंभीर आजारी तर ७ बळी!

चीनमध्ये नव्या व्हायरसचा फैलाव! ६० लोकं गंभीर आजारी तर ७ जणांचा बळी!

चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र या कोरोना विषाणूनंतर आता चीनमध्ये एक नवीन विषाणूचा फैलाव होत आहे. यामुळे चीनमध्ये आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला असून ६० लोक आजारी आहेत. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, पूर्व चीनच्या जियांगशू आणि अनहुई प्रांतात बरेच लोक आजारी पडले आहेत. हा विषाणू एखाद्या कीड्याने चावा घेतल्यास पसरतो.

या विषाणूमुळे जियांगशूमध्ये ३७ आणि अनहुईमध्ये २३ लोक आजारी आहेत. दोन्ही राज्यात या नवीन विषाणूमुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचे नाव हुईयांगशान बनयांगव्हायरस (Huaiyangshan banyangvirus) असे असल्याचे सांगितले जात आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार याला सामान्य भाषेत (SFTS) व्हायरस देखील म्हणतात.

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, या किड्याच्या चाव्याव्दारे जेव्हा विषाणू मनुष्याच्या शरीरावर संक्रमित होते. त्यावेळी व्यक्तीला ताप आणि खोकला जाणवतो. तर रुग्णाच्या शरीरातून ल्यूकोसाइट (Leukocyte) म्हणजेच रक्त पेशी कमी होऊ लागतात. असे सांगितले जात आहे की, जरी SFTS विषाणू नवीन नसला तरी सध्या चीनमध्ये त्याचा प्रसार होणे ही एक नवी गोष्ट आहे.

डॉक्टरांनी असे सांगितले की, हा विषाणू मानवांमध्ये किड्याच्या चाव्याने प्रवेश करतो. वैज्ञानिकांनी या व्हायरसला बुन्या व्हायरस प्रकारात असल्याचे सांगितले तर इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीला जर याची लागण झाली तर दुसरा व्यक्ती देखील यामुळे आजारी पडू शकतो. तसेच झिजियांग युनिव्हर्सिटीचे डॉक्टर शेंग जिफांग म्हणाले की, हा एसएफटीएस विषाणू मानवाच्या माध्यामातून इतर मानवांमध्ये पसरू शकतो. ही भीती नाकारू शकत नाही. हे रुग्णाच्या पेशीद्वारे किंवा रक्ताद्वारे निरोगी व्यक्तीमध्ये पसरू शकते.

डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की, या धोकादायक विषाणूचा संसर्ग किड्या चाव्याव्दारे वेगाने पसरत आहे. सध्या याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. चीन व्यतिरिक्त हा विषाणू जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि तैवानमध्येही आढळला आहे. या विषाणूचे प्रमाण १२ टक्के आहे. काही ठिकाणी ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

या विषाणूमुळे आजारी पडलेल्या लोकांना तीव्र ताप, उलट्या, अतिसार, अवयव निकामी होणे, रक्तपेशी कमी होणे, पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होणं आणि यकृत एंजाइमसारखे लक्षण आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे.


COVID 19 tests: देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाखाहून अधिक चाचण्या!

First Published on: August 6, 2020 9:49 AM
Exit mobile version