कोरोनामुळे New York ‘ऑउट ऑफ कंट्रोल’; राज्यपालांनी ‘Disaster Emergency’ केली घोषित

कोरोनामुळे New York  ‘ऑउट ऑफ कंट्रोल’; राज्यपालांनी ‘Disaster Emergency’ केली घोषित

कोरोनामुळे New York 'ऑउट ऑफ कंट्रोल'; राज्यपालांनी 'Disaster Emergency' केली घोषित

अमेरिकेचे राज्य न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा हाहाकार घातला आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने राज्यपालांनी आपत्कालीन आणीबाणी (Disaster Emergency) घोषित केली आहे. वाढते संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणार रुग्णांचा वेग वाढत असल्याचा अहवाल देते राज्यपालांनी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे. राज्यपालांच्या या आदेशाचे शीर्षक ‘न्यूयॉर्क राज्यात आपत्कालीनची घोषणा’ आहे.

आदेशात काय म्हणाले आहे?

‘मी कॅथी होचुल (Kathy Hochul), न्यूयॉर्क राज्याची राज्यपाल. संविधान आणि न्यूयॉर्क राज्यच्या कायद्याद्वारे मला दिलेल्या अधिकाराच्या आधारावर कार्यकारी कायदा कलम २-बीच्या कलम २८नुसार मी १५ जानेवारी २०२२ पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी आपत्कालीन आणीबाणी घोषित करते. कारण मला न्यूयॉर्कमध्ये आपत्ती आल्यासारखे दिसत आहे. ज्यासाठी स्थानिक सरकार पुरेसा प्रतिसाद देऊ शकत नाही.’

न्यूयॉर्कची परिस्थिती अत्यंत चिंताजनक

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रार्दुभाव आहे. गेल्या २४ तासांत न्यूयॉर्कमध्ये ५ हजार ७८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत न्यूयॉर्क राज्यात २८ लाख कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी जवळपास ५८ हजार जणांचा मृत्यू झाला असून २३.२६ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४ लाखांहून जास्त रुग्ण सक्रीय आहेत.

दरम्यान मध्यंतरी न्यूयॉर्कची परिस्थिती सुधारली होती, परंतु आतापर्यंत अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. अशी परिस्थिती पाहून राज्यपाल कॅथी होचुल यांनी आपत्कालीन आणीबाणी घोषित केली आहे.


हेही वाचा – इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, भारतात अलर्ट जारी


First Published on: November 27, 2021 9:13 AM
Exit mobile version