रेल्वेच्या शौचालयात आढळलेल्या अर्भकाचा मृत्यू

रेल्वेच्या शौचालयात आढळलेल्या अर्भकाचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

अमृतसर येथे रेल्वे गाडीच्या शौचालयात सापडलेल्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. हावडा एक्सप्रेस गाडीचे शौचालय साफ करताना एक अर्भक सफाई कर्मचाऱ्याला सापडले होते. शौचालयाच्या भांड्यात हे अर्भक फेकण्यात आले होते.  या अर्भकाच्या गळ्यात ओढणी गुंडाळली होती. या घटनेनंतर या अर्भकाला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवस उपचारानंतर अखेर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषीत केले आहे.

D-३ डब्यात आढळले होते अर्भक

या घटनेबद्दल सांगतांना रेल्वे कर्मचारी सफीने सांगितले आहे की,”रेल्वे यार्डात गाड्या सफाई कामासााठी येतात. दुपारी अडीचच्या सुमारास मला एक फोन आला. रेल्वे शैचालयातील भांड्यात एक मृत अर्भक असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्याने दिली. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारवर आम्ही एसी कम्पार्टमेंटच्या D-३ डब्यात गेलो. या अर्भकाला शौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आले होते. त्याच्या गळ्या भोवती असलेल्या ओढणीला खेचून त्याला बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यावर हे बाळ रडू लागल्याने ते जीवंत असल्याचे आम्हाला समजले. रेल्वे पोलिसांना याची माहिती देऊन आम्ही अर्भकाला अमृतसर नागरी रुग्णालयात दाखल केले.”

“ज्यावेळी अर्भकाला रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. बाळाला थंडी वाजत असल्याने त्याला बेबी व्हार्मर ठेवण्यात आले होते. चार डॉक्टरांची टीम या बाळाची काळजी घेत होती. हे बाळ काही दिवसांचेच होत. अखेर आज बाळाचा मृत्यू झाला आहे. ” – डॉ. संदीप, अमृतसर नागरी रुग्णालयात 

“हावडा एक्सप्रेस सकाळी साडे दहा वाजता अमृतसर स्टेशनला पोहोचली होती. यानंतर ती साफ सफाईसाठी यार्डमध्ये नेण्यात आली होती. या प्रकरणी ३१७ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. बाळाच्या मृत्यूनंतर ३०२ चा गुन्हा नोंदवण्यात आला.” – अमृतसर जीआरपीचे स्टेशन हाउस ऑफिसर (एसएचओ), बलबीर सिंह

First Published on: December 25, 2018 12:13 PM
Exit mobile version