तामिळनाडू आंदोलन; ९ लोकांचा मृत्यू तर १२ पेक्षा अधिक जखमी

तामिळनाडू आंदोलन; ९ लोकांचा मृत्यू तर १२ पेक्षा अधिक जखमी

तामिळनाडूत वेदांत स्टरलाईट कॉपर कंपनीवरोधात आंदोलन

तामिळनाडू येथे तुतिकोरीनमधील वेदांत स्टरलाईट कॉपर कंपनीविरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले असून ९ आंदोलकांचा मृत्यू झालाय तर १२ पेक्षा अधिक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. स्टरलाईटमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे या कंपनीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूनंतर या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. कारखान्याविरोधात आंदलनकर्ते अचानक आक्रमक झाले. आंदोलनकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी आंदोलकांची पळापळ झाली. दरम्यान या चेंगराचेंगरीत २० पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. आंदोलन हिंसक झाल्याने पोलिसांनी या भागात जमावबंदी लागू केली आहे.

या घटनेनंतर तामिळाडू सरकारनं आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आदोलनात जखमी झालेल्यांना ३ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

First Published on: May 22, 2018 2:57 PM
Exit mobile version