निर्भया प्रकरण : पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भया प्रकरण : पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मात्र, २ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका फेटाळली होती. त्यानंतर पवनने पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र, याचिकेमुळे आरोपींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

फाशीची याचिका पुन्हा पुढे ढकलली

दिल्लीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना आज सकाळी फाशी दिली जाणार होती. मात्र, पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली. त्यामुळे राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिला होता. त्याचबरोबर फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट लांबणीवर गेले आहे. पवन गुप्ताच्या दया याचिकेवर रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दुपारी निर्णय दिला. त्यामुळे आता आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच डेथ वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी करताना, त्यांना ३ मार्चला फाशी द्यावी, असा आदेश न्यायालयाने १७ फेब्रुवारीला दिला होता. तसेच यापूर्वी ७ जानेवारीला पहिल्यांदा ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी १७ जानेवारी आणि नंतर ३१ जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट लांबणीवर गेले आहे.


हेही वाचा – RBIला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं, बिटकॉईन्सची बंदी हटवली!


 

First Published on: March 4, 2020 3:07 PM
Exit mobile version