नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता भाजपमधील धुसफूस देखील समोर येऊ लागली आहे. तर, २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा ही पंतप्रधानपदासाठी चर्चिला जाऊ लागली आहे. सोशल मीडियावर त्याबाबतचे आता मेसेज देखील फिरू लागले आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार. शिवाय, तडजोडीचं देखील राजकारण करावं लागणार. पण, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं कुणाशीही पटत नसल्यानं ही मोट बांधणार कोण? अशा प्रश्न पडला आहे. तसेच मित्र पक्ष देखील भाजपवर नाराज आहेत. पक्षातून देखील नरेंद्र मोदींविरोधात नाराजी पाहायाला मिळत आहे. त्यासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असून नितीन गडकरींना पंतप्रधान करा अशी चर्चा सुरू आहे. शिवाय, ‘राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी’ असे मेसेज देखील सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.


तुम्ही हे वाचलंत का? – पाहा गडकरी काय म्हणतायत, ‘माल्ल्या घोटाळेबाज नाही!’

दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये देखील योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू आहे. मोदी जुमलेबाज आणि योगी आदित्यनाथ हिंदुत्व ब्रॅड अशी पोस्टर उत्तरप्रदेशमध्ये उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेनं लावली आहेत. यावेळी त्यांनी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. फ्रेब्रुवारी २०१९मध्ये उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेनं धर्म संसदेचं देखील आयोजन केलं असून पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुमलेबाज म्हणून संबोधण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजपमधील धुसफूस समोर आली आहे.

First Published on: December 13, 2018 11:55 AM
Exit mobile version