सर, मॅडमऐवजी आता ‘टीचर’ म्हणा, बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश

सर, मॅडमऐवजी आता ‘टीचर’ म्हणा, बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश

तिरूअनंतपुरम – शाळेतील शिक्षकांना सर किंवा मॅडम संबोधणं थांबवून शिक्षकांना आता टीचर म्हणण्याचे निर्देश केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत. स्त्री-पुरुष समानेतेची जागृती व्हावी, या करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार संबोधण्यापेक्षा त्यांनी टीचर म्हटलं गेलं पाहिजे, अशी याचिका एका व्यक्तीने केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे दाखल केली होती. त्यामुळे आयोगाच्या पॅनेलने शिक्षकांना टीचर संबोधण्याचे निर्देश दिले आहेत.


बुधवारी पॅनेलचे अध्यक्ष के व्ही मनोज कुमार आणि सदस्य सी विजयकुमार यांच्या खंडपीठाने सामान्य शिक्षण विभागाला सर्व सरकारी शाळांमध्ये टीचर शब्दाचा वापर करण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या म्हणण्यानुसार, “सर” किंवा “मॅडम” ऐवजी “टीचर संबोधण्याने समानता राखण्यास मदत होऊ शकते. तसेच, विद्यार्थ्यांचे शिक्षकांसोबतचे बंध देखील दृढ होण्यास मदत होईल.

केरळमधील सर्व शैक्षणिक संस्थांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, शिक्षकांना सर किंवा मॅडम म्हणणे त्यांच्या पेशासाठी सुसंगत नसल्याचीही टीप्पणी आयोगाने केली.

First Published on: January 13, 2023 4:16 PM
Exit mobile version