चीनचा डाव फसला; जम्मू-काश्मीरच्या चर्चेची फेटाळली मागणी

चीनचा डाव फसला; जम्मू-काश्मीरच्या चर्चेची फेटाळली मागणी

चीनचा डाव फसला; जम्मू-काश्मीरच्या चर्चेची फेटाळली मागणी

पाकिस्तानाचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र हीच मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत फेटाळून लावली. काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असून तो या आधीच संयुक्त राष्ट्रे आणि इतर मंचावर मांडला गेला आहे. त्यामुळे आता परत त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे म्हणतं फ्रान्सने भारताला मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सच्या या भूमिकेमुळे चीन हा डाव फसला आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर चीनने ऑगस्टमध्ये सुरक्षा मंडळात गुप्त चर्चेची मागणी केली होती. त्याप्रमाणे बंद दाराआड चर्चा देखील करण्यात आली. मात्र या चर्चेत काही निष्पण झाले नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीर प्रश्नाचे पाकिस्तानने चीनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा डाव फसला होता. त्यावेळी या चर्चेनंतर चीनचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत आणि पाकिस्तानचे राजदूत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास मनाई केली होती.

चीनचा जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबद्दलचा आता दुसऱ्यांदा डाव फसला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीरवर चर्चा न घेण्याचे ठरले आहे. फ्रान्सच्या राजनैतिका सूत्रांच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर मंगळवारी होणारी चर्चा टळली आहे.


हेही वाचा – दिल्लीत पुन्हा हिंसाचार


 

First Published on: December 18, 2019 10:47 AM
Exit mobile version