Corona Vaccination : लसीकरणाचे प्रमाण पत्र दाखवत घेऊन जा दारु, उत्तरप्रदेशातील दुकांनाबाहेरील पोस्टर

Corona Vaccination : लसीकरणाचे प्रमाण पत्र दाखवत घेऊन जा दारु, उत्तरप्रदेशातील दुकांनाबाहेरील पोस्टर

लसीकरणाचे प्रमाण पत्र दाखवत घेऊन जा दारु, उत्तरप्रदेशातील दुकांनाबाहेरील पोस्टर

देशात कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन अद्याप कायम आहे. उत्तर प्रदेशातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनच्या नियमांचे काटोकोरपणे पालन केले जात आहे. यात उत्तरप्रदेशातील इटावा जिल्ह्यात अनेक दारुच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. अलिगडमधील विषारी दारुच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात पोलिस पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. अनेक भागांतील दारुचे ठेके, दारुच्या दुकानांची कसून तपासणी केली जातेय.

दरम्यान सैफई शहारतही एसडीएम हेम कुमार सिंग यांनी त्यांच्या परिसरात पोलीस दलासह दारूचे ठोकेस दारुची दुकाने कसून तपासली. यावेळी नुसती तपासणी करुन ते थांबले नाहीत तर प्रत्येत दारुच्या दुकानांवर लसीकरणासंबंधित पोस्टर्सही चिटकवले आहेत. या पोस्टरवर त्यांनी, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवतील त्यांनाच दारू विकली जाईल. त्यामुळे पहिल्यांदा लस घ्या नंतरच दारु खरेदी करा असा सज्जड इशाराही त्यांनी मद्यप्रेमींना दिला आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय मद्यविक्री करु नका

तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करु नका अशा कडक सुचनाही त्यांनी दारू दुकानदारांना दिल्या आहेत. दरम्यान देशात लसीकरण मोहिम अधिक वाढवण्यासाठी प्रत्येक राज्य वेगवेगळे रणनिती आखत आहेत. दारूची दुकाने राज्याचा महसूल वाढवण्यात ज्याप्रकारे मदत करतात त्याचप्रकारे लसीकरण मोहिमेतही दारु दुकानांची मदत घेतली जात आहे.

…. तर अशा ग्राहकांना दारु न देता घरी परत पाठवत आहोत.

एसडीएस साहेबांनी दुकानांची पाहणी करत हे पोस्टर्स लावले आहेत. तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय ग्राहकांना दारूची विक्री करु नये अशा सुचना दिल्याचे दारु दुकानदार सांगतात. अनेक ग्राहकांना आम्ही लस घेण्याचे आवाहन करत आहोत. परंतु बहुतेक लोक लसीचे प्रमाणपत्र न घेता येत असल्याने आम्ही त्यांना दारु न देता घरी परत पाठवत आहोत. असेही दुकानदार सांगतात.

यावर बोलताना उत्पादन शुल्क अधिकारी सांगतात, दारू दुकानदारांना ग्राहकांचे लसीकरण करण्याचे अधिकृत आदेश नाहीत. परंतु सैफईचे एसडीएम करत असतील तर तो त्यांचा स्वत :चा निर्णय आहे. लसीकरणासाठी आवाहन करणे चांगली गोष्ट आहे पण ती दारू विक्रीसाठी अनिवार्य करणे योग्य नाही.


 

First Published on: May 31, 2021 10:30 AM
Exit mobile version