Nobel Prize 2020: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; अल्टर, ह्यूटन, राईस ठरले मानकरी

Nobel Prize 2020: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; अल्टर, ह्यूटन, राईस ठरले मानकरी

यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार शास्त्रज्ञ हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या तिघांना हिपॅटायटिस सी या विषाणूच्या शोधासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिनही शास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिल्याने त्यांचा हा बहुमूल्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या शास्त्रज्ञांना जवळपास ११ लाख २० हजार डॉलरचा पुरस्कार मिळणार आहे. पुरस्काराची रक्कम तिन्ही शास्त्रज्ञांना समान वितरीत करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले की, या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली. तसेच या आठवड्यात अन्य नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराचा समावेश असणार आहे.

हेही वाचा –

संघ, भाजपसाठी महिला म्हणजे उपभोग्य वस्तू; प्रकाश आंबेडकरांची गंभीर टीका

First Published on: October 5, 2020 4:43 PM
Exit mobile version