Nobel : स्पर्शाच्या रिसेप्टर्सचे संशोधन, दोन अमेरिकन वैज्ञानिकांना नोबेल

Nobel : स्पर्शाच्या रिसेप्टर्सचे संशोधन, दोन अमेरिकन वैज्ञानिकांना नोबेल

फिजिओलॉजी आणि मेडिसीन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकन वैज्ञानिक डेव्हिड जूलिअस आणि अर्देम पटापाउटियन यांना घोषित झाला आहे. तापमान आणि स्पर्शासाठीचा रिसेप्टर्स शोधण्यासाठीचा हा नोबेल देण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा नोबेल कमिटीचे महासचिव थॉमस पर्लमनने केली. आपल्याला जग समजण्यासाठी मदत करण्याच्या अनुषंगाने हे संशोधन महत्वाचे आहे, म्हणूनच हा पुरस्कार नोबेल समितीकडून देण्यात आला आहे.

तापमान, दुखण आणि दाब या तिन्ही गोष्टी आपल्याला स्पर्शाने जाणवतात. पण याबाबतची अधिक माहिती उपलब्ध नाही. यावरच जूलियन आणि पटापाउटिनचे संशोधन आधारीत आहे. डेविल जूलियन हे युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे प्राध्यापक आहेत. अर्देम पटापाउटियन हे अर्मेनियाई येथील मूळ अमेरिकन नागरिक आहेत. ला जोला येथील स्क्रिप्स इंस्टीट्यूट येथे ते वैज्ञानिक आहेत.

गेल्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक हे संयुक्त स्वरूपात तीन वैज्ञानिकांना देण्यात आले होते. त्यामध्ये हार्वे जे अल्टर, माईकल ह्यूटन आणि चार्ल्स एम राइस यांना देण्यात आले होते. यकृतांना हानी पोहचवणाऱ्या हेपेटाइटिस सी व्हायरसच्या शोधासाठीचा हा पुरस्कार होता. या संशोधनामुळे घातक अशा आजाराच्या शोधासाठी मदत मिळाली होती.

नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या व्यक्तीला एक गोल्ड मेडल, १.१४ मिलिअन डॉलर असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्यापासून या पुरस्काराला सुरूवात झाली. मेडिसिन शिवायच फिजिक्स, केमेस्ट्री, साहित्य, शांती आणि इकॉनॉमिक्स या क्षेत्रात नोबेल पारितोषिक देण्यात येते.


 

First Published on: October 4, 2021 5:41 PM
Exit mobile version