पाळीव कुत्र्याला ठार मारून खा! सनकी किंम जोंगचा फतवा

पाळीव कुत्र्याला ठार मारून खा! सनकी किंम जोंगचा फतवा

किम जोंग

सध्या उत्तर कोरियात अन्नधान्याची टंचाई जाणवत असल्याने खाद्यान्न संकटावर मात करण्यासाठी अन्न धान्य उत्पादन वाढवण्याऐवजी आता पाळीव कुत्र्यांना ठार करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत तर पाळीव कुत्र्याला ठार मारून खा, असा फतवाच किंम जोंगने काढला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा, राष्ट्रपती किम जोंग उन यांनी श्वान पाळणे हे भांडवलशाहीच्या मूल्याचे प्रतिक असल्याचे सांगत श्वान पाळण्यावर बंदी घातली होती.

उत्तर कोरियाला अन्नधान्याचा पुरवठा चीनमधून…

संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालानुसार, उत्तर कोरियात नागरीक अन्न टंचाईचा सामना करत असून अणवस्त्र आणि शस्त्र निर्मितीमुळे असलेल्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाची परिस्थिती आणखी हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाला बहुतांशी अन्नधान्य पुरवठा हा चीनमधून करण्यात येतो.

कोरोनाच्या संसर्गामुळे चीनने सीमा बंद केल्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय मागील वर्षी उत्तर कोरियात नैसर्गिक आपत्तीही मोठ्या प्रमाणावर आली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम अन्नधान्य साठ्यावर झाला.

कोरियन बेटांवर श्वानांचे मांस खाल्ले जाते

दरम्यान, उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी श्वान पाळणारी घरे शोधण्यास सुरू केले आहे. लोकांच्या घरातून जबरस्तीने श्वान उचलण्यास सुरुवात केली आहे. या श्वानांना शासकीय प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणांहून रेस्टोरंट्सला श्वानांच्या मांसाचा पुरवठा करण्यात येतो, असे वृत्त कोरियातील Chosun Ilbo या वृत्तपत्राने दिले आहे.

तसेच, कोरियन बेटांवरील देशांमध्ये श्वानांचे मांस खाल्ले जाते. तर दक्षिण कोरियामध्ये सध्या याचे प्रमाण कमी असले तरी उत्तर कोरियात मात्र आजही याचे प्रमाण आहे. असे सांगितले जाते की, राजधानी प्योंगयांगमध्ये श्वान मांसाची अनेक रेस्टोरंट्स आहेत. श्वानांचे मांसामुळे एनर्जी आणि स्टॅमिना मिळत असल्याचा दावा करण्यात येतो. थंडीच्या काळात भाज्यांसह याचे सूप बनवले जाते. थंडीमध्ये शरीराचे तापमान वाढवण्यासाठी या सूपाचे सेवन केले जाते.


क्षुल्लक वादातून पतीने केले पत्नीचे सहा तुकडे, एका बीलामुळे पकडला गेला!

First Published on: August 18, 2020 4:42 PM
Exit mobile version