CoronaVirus: …म्हणून कोरोनाच्या संकटातून उत्तर कोरिया बचावला!

CoronaVirus: …म्हणून कोरोनाच्या संकटातून उत्तर कोरिया बचावला!

CoronaVirus: ...म्हणून कोरोनाच्या संकटातून उत्तर कोरिया बचावला!

संपूर्ण जगावर कोरोना या महामारीच सावट आहे. मात्र किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियामध्ये अजूनही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही आहे, हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. त्यांनी असं देशात काय केलं आहे की जो शेजारी असलेल्या दक्षिण कोरिया करू शकला नाही. तर मग आपण आज जाणून घेऊया की, किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाला या जीवघेण्या कोरोना व्हायरसापासून कसा बचाव केला? आणि देशात एकही रुग्ण नसल्याच्या त्याचा दाव्यात काही तथ्य आहे का?

उत्तर कोरियातील आरोग्य सुविधा

किम जोंग उन यांनी देशाचा कोरोनापासून कसा बचाव केला हे पाहण्याआधी उत्तर कोरियातील आरोग्या विषयी सुविधा कशी आहे. कारण यामुळे कळेल की किम जोंग उन यांचा दावा खरा आहे की खोटा? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. इतर देशांपेक्षा उत्तर कोरियातील आरोग्य सुविधा ही खूप उत्तम आहे. बॉम्ब बनवण्याव्यतिरिक्त किम जोंग उन यांनी डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यावर जास्त भर दिला आहे. तथापि इतर पाश्चात्य देशांपेक्षा इथल्या डॉक्टरची पात्रता कमी आहे आणि त्यांच्या तुलनेत पगारही कमी मिळतो. परंतु असे असूनही उत्तर कोरियातील डॉक्टर लोकांना आरोग्य सेवा देत आहेत. या कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय उपकरणे आणि माहितीचा अभाव असला तरी तिथले डॉक्टर कोरोनाशी सामना करत आहेत. कारण या जीवघेण्या व्हायरसची अजूनही कोणतीही लस तयार झालेली नाही. यावर मात करण्यासाठी उत्तम वैद्यकीय उपकरणे आणि उत्तम आरोग्य सेवा देण्याची गरज आहे.

उत्तर कोरियावरील निर्बंधांमुळे नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे सोपे नाही आहे. तरी देखील उत्तर कोरियात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. परंतु छोट्या शहरातील आणि गावातील रुग्णालयांना या कोरोना सामना करणे कठीण आहे.

उत्तर कोरियाच्या केंद्रीय अँटी-एपिडेमिक विभागाने असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसचा देशात प्रवेश होऊ नये याकरिता अनेक प्रयत्न सुरू केले जात आहेत. तसंच वैज्ञानिक दृष्टीकोनातून अनेक पावले उचलली गेली आहे. देशात येणा-जाणाऱ्या लोकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहेत. इतर लोकांमध्ये जाण्यापूर्वीच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

बाहेरून येणाऱ्या सामान देखील निर्जंतुकरण करून वापरले जात आहे. देशातील सीमांसह जल, हवाई मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटापासून उत्तर कोरिया बचावला आहे. उत्तर कोरियात अजूनही एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. उत्तर कोरियाच्या केंद्रीय अँटी-एपिडेमिक विभाग म्हणतो की, सुरुवातीपासून केलेल्या कठोर सूचनामुळे देशातील प्रत्येक जण आज सुरक्षित आहे. जेव्हा बाजूच्या चीन देशात कोरोनाचा जानेवारीमध्ये पहिला रुग्ण आढळला. तेव्हा सरकारने कोरोनाचा सामना करण्याची सुरुवात केली होती.

उत्तर कोरियातील मीडिया देखील सतत हा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी जागृत करत आहे. दररोज वर्तमानपत्राच्या पूर्ण पानात सरकारची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी सामना करण्याचे प्रयत्न सांगितलं जात आहे. यामुळे उत्तर कोरियातील लोकांना कोरोना व्हायरसबद्दल बरेच माहित आहे. सरकार सतत लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहे. घरातील मुख्य गेटच्या हॅंडल देखील निर्जंतुकीकरण करायला सांगत आहे. तसंच प्रशासनाकडून सार्वजनिक वाहनांना निर्जंतुकीकरण केलं जात आहे.


हेही वाचा – CoronaVirus: लॉकडाऊनमुळे कुटुंबाने केली आत्महत्या!, घ्या सत्य जाणून


 

First Published on: April 14, 2020 10:37 PM
Exit mobile version