ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडेन यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप

ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडेन यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष ठरले होते. मात्र लोकप्रियतेसोबतच त्यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. जवळपास दोन डझन महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र ट्रम्प यांनी हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. ट्रम्प यांच्या महिलांसोबतच्या या व्यवहारामुळे अनेकजण त्यांच्यावर टीका देखील करतात.

‘ऑल द प्रेसीडेंट वूमन: डोनाल्ड ट्रम्प अँड द मेकिंग ऑफ ए प्रीडेटर’ या पुस्तकात ट्रम्प यांनी २६ महिलांसोबत दुर्व्यवहार केल्याचे लिहण्यात आले आहे. या पुस्तकात महिला पीडितांच्या गोष्टींसोबतच १०० हून अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मात्र महिलांनी शोषणाचे आरोप लावलेले ट्रम्प एकटेच नाहीत. तर २०२० साली ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेल्या जो बायडेन यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप लागलेले आहेत.

५६ वर्षीय तारा रीडने सांगितले की, ती १९९२ साली बायडेन यांची सहाय्यक म्हणून काम करत होती. तिने १९९३ साली बायडेन यांच्यावर बळजबरी आणि विनयभंगाचा आरोप लावला होता. असोशिएट प्रेसला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये ताराने सांगितले होते की, बायडेन तिच्याजवळ येऊन कानाजवळ हळू आवाजात बोलायचे. एकदा त्यांनी तिचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला होता. ताराने वैतागून बायडेन यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा बायडेन यांनी तित्यावर भलते आरोप लावले होते. तसेच ९ एप्रिल २०२० रोजी ताराने एक फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करत तिचे लैंगिक शोषण झाले असल्याचे म्हटले होते. मात्र या तक्रारीत तिने बायडेन यांचा उल्लेख केला नव्हता.

मागच्या वर्षभरात कमीत कमी आठ महिलांनी बायडेन यांच्या वर्तनुकीवर टीका केली आहे. महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, चुंबन घेणे असे आरोप त्यांच्यावर लागलेले आहेत. बायडेन यांची सहकारी लूसीने न्यूयॉर्क मासिकासोबत बोलताना बायडेन यांच्यावर किस केल्याचा आरोप केला होता. मात्र बायडेन यांनी हा आरोप फेटाळून लावताना सांगितले होते की, “निवडणूक प्रचारादरम्यान सहकाऱ्यांमध्ये जोश वाढविण्यासाठी कडकडीत मिठी मारतो… एकप्रकारे एकमेकांचा उत्साह वाढविण्यासाठी असे केले जाते. मात्र मी कुणासोबतचही चुकीचे वर्तन केलेले नाही.”

First Published on: November 5, 2020 9:07 PM
Exit mobile version