आता नाकावाटे कोरोना प्रतिबंध लस, केंद्राने दिली परवानगी

आता नाकावाटे कोरोना प्रतिबंध लस, केंद्राने दिली परवानगी

नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाचा (Corona Virus in India) धोका वाढल्याने केंद्र सरकारने उपाययोजना जारी केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने यासंदर्भात बैठका होत आहेत. त्यातच, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत बायोटेकने निर्मिती केलेल्या नाकावाटे घेता येणाऱ्या नेजल लसीच्या (Nasal Vaccine) वापरासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. ही लस बुस्टर डोसच्या स्वरुपात देण्यात येणार असून सध्या केवळ खासगी रुग्णालयात उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा – Coronavirus : देशातील पहिल्या नेजल लसीला DCGI ची मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

सार्स सीओवी-२ सारखे अनेक विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. नेजल लसीच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूला रोखता येणार आहे. इंट्रानोजल लस इम्युनोग्लोबुलिनची निर्मिती करतं. ज्यामुळे नाकातच रोगप्रतिकारक प्रतिक्रिया केली जाते. यामुळे संसर्ग रोखता येऊ शकतो.

नेजल लसीचे वैशिष्ट्य काय?

केंद्र सरकारद्वारे याआधीही नेजल लसीला मंजूरी देण्यात आली होती. सहा सप्टेंबर रोजी Drugs Controller General of Indiaने या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती. १८ वर्षांवरील मुलांसाठी ही लस वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या लसीच्या बुस्टर डोससाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, फक्त खासगी रुग्णलायात या लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत.

First Published on: December 23, 2022 3:42 PM
Exit mobile version