Coronavirus : देशातील पहिल्या नेजल लसीला DCGI ची मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जातो. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाते. अशातच आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, कोरोना महामारीविरुद्ध भारताला आणखी एक यश मिळाले आहे. दे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जातो. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाते. अशातच आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, कोरोना महामारीविरुद्ध भारताला आणखी एक यश मिळाले आहे. (Bharat Biotech Gets Emergency Use Authorization From DCGI For Intranasal Covid 19 Vaccine)

देशातील पहिली नेजल लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, भारत बायोटेकने कोरोनासाठी बनवलेल्या देशातील पहिल्या नेजल लसीला भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोविड-19 विषाणूसाठी ही भारतातील पहिली नेजल लस असेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारताच्या कोरोना साथीच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि लिहिले की, “कोविड-19 विरुद्ध भारताच्या लढ्यात एक मोठे पाऊल! भारत बायोटेकच्या ChAd36-SARS-CoV-S कोविड-19 (चिंपांझी एडेनोव्हायरस वेक्टरेड) नाकातील लस केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने 18+ वयोगटातील प्राथमिक लसीकरणासाठी कोरोना साथीच्या रोगाविरूद्ध आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मंजूर केली आहे”.

“हे पाऊल महामारीविरुद्धच्या आमचा एकत्रित लढा आणखी मजबूत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात विज्ञान, संशोधन आणि विकास आणि मानव संसाधनांचा वापर केला आहे”, असेही त्यांनी म्हटले.

नेजल लस कशी कार्य करते?

  • नाकातील फवारणीची लस इंजेक्शनने न देता नाकातून दिली जाते.
  • हे नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती निर्माण करते.
  • हे देखील अधिक प्रभावी मानले जाते कारण कोरोनासह बहुतेक वायुजन्य रोगांचे मूळ मुख्यतः नाक असते.
  • त्याच्या अंतर्गत भागांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणे अशा रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

नेजल लसीचे फायदे

  • इंजेक्शनमधून सुटका.
  • नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती निर्माण करून, श्वसन संक्रमणाचा धोका कमी होईल.
  • इंजेक्शन्सपासून मुक्ती मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज नाही.
  • मुलांना लसीकरण करणे सोपे होईल.
  • उत्पादन सुलभतेमुळे जगभरातील मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य आहे.

हेही वाचा – पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशविसर्जन, मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब