आता मानवी शरीरातील कोरोनाचा श्वान लावणार शोध!

आता मानवी शरीरातील कोरोनाचा श्वान लावणार शोध!

कुत्रे शोधणार मानवी शरीरातील कोरोना

प्रत्येक देश आपपल्यापद्धतीने कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्यन्त करीत आहेत. कोणत्या देशात कोरोना टेस्ट वाढवून कोरोनाचे रूग्ण शोधले जात आहेत तर कुठे लॉकडाऊन सुरू आहे. मात्र फिनलँडने नवीन आयडीया शोधली आहे, त्यांनी कोरोना रूग्ण शोधण्यासाठी श्वानांची मदत घेतली आहे.

फिनलँडमधील नॉर्डियाक कंट्रीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे श्वान वास घेऊन समोरची व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याचा तपास करू शकणार आहेत. यासाठी विमानतळावर ४ श्वान तैनात केले आहेत. त्यांना Fnlands Smell Detection Association ने ट्रेनिंग दिलं आहे. कुत्र्यांच्या मदतीनं कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा शोध घेणारा फिनलँड हा UAE नंतरचा दुसरा देश ठरला आहे.

फिनलँडच्या या प्रयोगाकडे स्वस्त आणि सर्वांत विश्वासू पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर तात्काळ त्यांना या कुत्र्यांच्या मदतीनं तपासलं जाणार आहे. मात्र जर प्रवासी स्वतः टेस्ट करण्यासाठी तयार असेल तर मात्र या श्वानांच्या मदतीनं त्याची चाचणी केली जाणार नाही. प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या त्वचेच्या वरच्या थराचा नमुना घेतला जातो. त्यानंतर एका बरणीत भरून हा नमुना या श्वानांकडे दिला जातो. त्यानंतर १० सेकंद वास घेतल्यानंतर हे श्वान त्यांच्या काही ठराविक कृत्यांनी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे सांगतात. पायाचा पंजा घासून अथवा भुंकून किंवा लोळून ते आपला निष्कर्ष सांगतात. या सर्व कामासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागत असून प्रवाशांनादेखील ताटकळत उभं रहावं लागत नाही. जर या टेस्टमध्ये व्यक्ती पॉझिटिव्ह ढळली तर त्याला कोरोनाची टेस्ट करायला सांगितलं जातं. यामुळं नक्की हे श्वान बरोबर आहेत की नाही हेदेखील तपासलं जातं.


हे ही वाचा – धक्कादायक! आता मुद्दाम मानवी शरीरात सोडला जाणार कोरोनाव्हायरस कारण


First Published on: September 24, 2020 11:15 PM
Exit mobile version