आता नको असलेल्या चॅनेल्सना करा रामराम!

आता नको असलेल्या चॅनेल्सना करा रामराम!

आता नको असलेल्या चॅनेल्सना करा रामराम!

टीव्हीवर आपण मोजकेच चॅनेल पाहात असतो. पण अनेकदा केबल ऑपरेटर तुम्ही न पाहणाऱ्या चॅनेल्सचा अधिक भरणा तुमच्या पॅकेजमध्ये करतो आणि त्याप्रमाणे बील देखील लावतो. त्या संदर्भात त्याच्याशी विचारणा केल्यावर त्याचे समाधानकारक उत्तरही देत नाही. पण या पुढे तुमच्यासोबत अन्याय होणार नाही. कारण येत्या १ जानेवारीपासून टीव्हीवरील चॅनेल्सची निवड पद्धती आणि त्यांचे दर यामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दूरसंचालक नियामक ट्रायने या संदर्भातील एक आदेश देखील जारी केला आहे.

वाचा- खुशखबर! २५ हजार गावांना मिळणार ‘वाय-फाय’

काय आहे ट्रायचा आदेश?

चॅनेल्सची किरकोळ किंमत ठरविणे केबल ऑपरेटर्सना बंधनकारक केले आहेत. त्यानुसार त्यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी निवडलेल्या पॅकेजमध्ये अजिबात न पाहिल्या जाणाऱ्या चॅनेलचा भरणा करुन अधिक पैसै उकळणाऱ्या लबाड केबल ऑपरेटर्सना लगाम लागणार आहे. नव्या पद्धतीमध्ये आपण आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडून त्यांचेच पैसे केबल ऑपरेटरला देणे ग्राहकांना शक्य होणार आहे. चॅनेल्सचे एक पॅकेज विक्रीस ठेवण्याचा हक्क असणार आहे. या पॅकेजची किंमत त्यांना सर्व चॅनेल्सच्या एकूण किंमतीच्या ८५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. म्हणजेच चॅनेल्सच्या पॅकेजवर १५ टक्क्यांपेक्षा जास्त सवलत प्रसारक देऊ शकणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

वाचा- ट्रेनमध्ये प्रवास करताना ‘हे’ नेटवर्क उत्तम

निकाल सुप्रीम कोर्टात

ट्रायने हा आदेश जरी दिला असला तरी सध्या ही गोष्ट सुप्रीम कोर्टात आहे. जर कोणतीही कायदेशीर अडचण आली नाही तर १ जानेवारीपासून हा आदेशाची त्वरीत अमंलबजावणी केली जाणार आहे. प्रसारकांच्या एका याचिकेवर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. या निर्णयाला ट्रायने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, आता या सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

First Published on: December 13, 2018 12:33 PM
Exit mobile version