घरदेश-विदेशखुशखबर! २५ हजार गावांना मिळणार 'वाय-फाय'

खुशखबर! २५ हजार गावांना मिळणार ‘वाय-फाय’

Subscribe

ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाय-फाय डेटा कूपनचा वापर करावा लागणार आहे. यासाठी ५ ते ५० रुपयांपर्यंतचे कूपन ठेवण्यात येणार आहे.

सध्या मोबाईल असणाऱ्यांसाठी फ्री वाय- फाय किती महत्वाचा आहे, हे सांगायलाच नको. पण अद्याप ज्या गावांमध्ये इंटरनेट नाही. अशा गावांना आता त्यांच्या हक्काचा वाय- फाय मिळणार आहे. मार्च २०१९ पर्यंत तब्बल २५ हजार गावांमध्ये ५ लाख वाय- फाय लावण्यात येणार आहे. दूरसंचालय मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे. वाय- फायची जबाबदारी टेलिकॉम कंसल्टंट इंडिया लिमिटेड आणि भारतीय टेलिकॉम इंडस्ट्री लिमिटेड या कंपन्यांवर असणार आहे.

वाचा-  गुगलचं ‘हे’ अॅप हरवलेला फोन देणार शोधून

५ लाख वाय-फाय लावणार

गावांना जोडण्यासाठी इंटरनेट हे महत्वाचे आहे. हे लक्षात घेत दूरसंचार मंत्रालयाने ज्या गावांमध्ये वाय-फाय नाही, अशा गावांना वाय- फाय सुविधा पुरविण्याचे दूरसंचार मंत्रालयाकडून ठरवण्यात आले आहे. त्यानुसार देशातील २५ हजार गावांमध्ये वाय- फाय सुविधा देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार या २५ हजार गावांमध्ये तब्बल ५ लाख वाय फाय लावण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयाकडून टेंडर मागविण्यात आले होते. यासाठी दोन कंपन्यांची निवड करण्यात आली. यात टेलिकॉम कन्स्लटंट इंडिया आणि भारतीय टेलिफोन इंडस्ट्री लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली. या कंपन्या मार्चपर्यंत वाय- फाय लावण्याचे काम करणार आहेत.

- Advertisement -
वाचा- ट्रेनमध्ये प्रवास करताना ‘हे’ नेटवर्क उत्तम

कूपन सिस्टीमने वापरा वाय- फाय

ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाय-फाय डेटा कूपनचा वापर करावा लागणार आहे. यासाठी ५ ते ५० रुपयांपर्यंतचे कूपन ठेवण्यात येणार आहे. यामुळे अनेक लहान इंटरनेट ऑपरेटर्सना चांगली संधी मिळेल. याशिवाय लोकांना त्यांच्या वापरानुसार लहान- मोठे रिचार्ज मिळणार आहे. शिवाय यामुळे रोजगारांच्या अनेक संधीदेखील यातून निर्माण होणार आहेत. ट्रायकडून या संदर्भातील एक पायलेट प्रोजेक्ट बंगळुरुमध्ये राबविण्यात आला. जो यशस्वी ठरला. त्यामुळेच आता २५ हजार गावांना याच पद्धतीने वाय-फाय लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी १० लाख वाय- फाय लागणार

५ लाख वाय फाय व्यतिरिक्त अन्य १० लाख वाय- फाय सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहे. तीन वर्षांमध्ये हे वाय- फाय लावण्यात येणार असून पुढील काळात १५ लाख वाय-फाय सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा कंपनीचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -