NSA अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; पाच वर्षांची मुदतवाढही

NSA अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; पाच वर्षांची मुदतवाढही

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. तसेच त्यांचा सेवाकाळ लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या निरीक्षणात भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक केला. अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची नियुक्ती केली होती. डोवाल १९६८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

‘रॉ’ मध्ये कार्यरत असताना पाकिस्तानात वास्तव्य

भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘रॉ’ मध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा अजित डोवाल यांना अनुभव आहे. पाकिस्तानबाबत भारताने जे कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यामागे अजित डोवाल असल्याची नेहमीच चर्चा असते. अजित डोवाल ‘रॉ’ मध्ये कार्यरत असताना अनेक वर्ष ते पाकिस्तानात होते. त्यामुळे पाकिस्तान संदर्भात रणनिती आखण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. २०१६ साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता तसेच पुलवामा हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने केलेल्या एअर स्ट्राइकमध्येही त्यांची महत्वाची भूमिका होती.

First Published on: June 3, 2019 2:46 PM
Exit mobile version