Video: नर्सेसनी डॉक्टरला बेदम चोपले

Video: नर्सेसनी डॉक्टरला बेदम चोपले

बिहारच्या रुग्णालयात नर्सेसकडून डॉक्टरला मारहाण (सौजन्य-indiatoday)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये काही नर्सेस मिळून डॉक्टरला चांगलंच झोडपताना दिसत आहेत. ही घटना आहे बिहारच्या कटिहारमधील या रुग्णालयातील. व्हिडिओमधील डॉक्टरवर एका महिला कर्मचाऱ्याला छेडल्याच्या आरोप लावण्यात आल्यामुळे रुग्णालयातील संतापलेल्या नर्सेसने त्याची चांगलीच धुलाई केली. दरम्यान या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नर्सेसला डॉक्टरच्या तावडीतून सोडवायची धडपडही करतो आहे. मात्र, रागावलेल्या नर्सेसपुढे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहेत. एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचराच्या प्रकरणांवरुन देशभरात संताप व्यक्त होत असताना, वारंवार असे प्रकार घडणं खरोखरंच संतापजनक आणि लाजिरवाणं आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित डॉक्टरने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्यानंतर सर्व नर्सेसनी एकत्र येत वरिष्ठ डॉक्टरकडे त्याची तक्रार केली. नर्सेसकडून संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर आरोपी डॉक्टरला बोलवण्यात आले. दरम्यान, ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’, अशी मागणी तिथे उपस्थित नर्सेसनी केली. त्यानंतर अचानक परिस्थिती बिघडली आणि संतापलेल्या नर्सेसने आरोपी डॉक्टरला थेट चपलांनी मारायला सुरुवात केली. सध्या आरोपी डॉक्टर रुग्णालयातून फरार असून याप्रकरणी पोलीसंचा पुढील तपास सुरु आहे.


वाचा : तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजूरी

First Published on: September 19, 2018 3:13 PM
Exit mobile version